हल्‍याळच्चा जवानाची लेफ्टनंटपदी झेप

Dainik Gomantak
मंगळवार, 23 जून 2020

कष्ट, जिद्दीच्‍या बळावर प्रकाश सिदलानीची उच्चपदापर्यंत झेप

संताेष पाटील
हल्याळ

मंगळवाड - हल्ल्‍याळ येथील प्रकाश सिदलानी या जवानाला अलीकडेच लेफ्टनंटपदी बढती देण्यात आली आहे. तो सध्या डेहराडूनमध्ये सैन्‍यदलात कार्यरत आहे. प्रकाश हा मंगळवाड येथील मध्‍यमवर्गीय कुटुंबातील असून त्‍याचे वडील शेतकरी आहेत. कष्‍ट आणि जिद्दीच्‍या बळावर प्रकाशने लेफ्‍टनंटपदापर्यंत बढती प्राप्‍त केली आहे.
प्रकाशने सैन्यात जाण्यासाठी खूप परिश्रम घेतले. ग्रामीण परिसरात प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर हल्याळ येथील केएलएस महाविद्यालयात पुढील शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर सैन्यात भरती झाल्यानंतही त्याने शिक्षण सुरूच ठेवले. सैन्‍यदलात भरती झाल्यानंतर वेगळे काही करण्यासाठी तो धडपड होता. त्याने घेतलेल्‍या कष्‍टामुळे त्‍याला लेफ्टनंटपदी बढती मिळाली.
गरीब परिस्थितीतही पैशांची कमतरता होती. पण, अनेक समस्याही होत्या, त्या सर्व समस्यांना सामोर जाऊन त्याने आपल्या जिद्दीने कठीण परिश्रमाच्‍या बळावर ह‍ल्याळ तालुक्यातील मंगळवाड येथील शेतकरी कुटुंबातून भारतीय सैन्यात रुजू झाला आणि उच्चपदापर्यंत पोहोचला.
प्रकाश सिदलानी या २९ वर्षीय युवकाचे वडील मारुती आणि आई यल्लवा हे शेतकरी आहेत. प्रकाशने अत्‍यंत हलाखीच्‍या परिस्‍थितीत शालेय शिक्षण घेतले. पहिली ते दहावीपर्यंत मंगळवाड येथील प्राथमिक शिक्षण घेऊन तो पुढील शिक्षणासाठी हल्याळ येथील के.एल.एस सायन्स महाविद्यालयात बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्‍यानंतर तो सैन्यात भरती झाला. त्‍याने आपल्‍या कर्तृत्‍वाच्‍या बळावर लेफ्‍टनंटपदापर्यंत मजल मारली व त्‍याने कारवार जिल्ह्यातील हल्याळ तालुक्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर झळकावले आहे.
प्रकाशने सैन्यात रुजू झाल्यानंतर सुरवातीची पाच वर्षे लॅब टेक्निशियन म्हणून काम केले आणि पदवीधर होण्यासाठी त्याने पुढे शिक्षण सुरू ठेवले. त्‍याच्‍या उत्तम कामगिरीबद्दल २०१६ मध्ये आर्मी कॅडेट्‍स कॉलेजमध्ये परीक्षेत उत्तीर्ण झाला. सैन्यात लॅब टॅक्निशियन म्हणून काम करताना २०१६ मध्ये आर्मी कॅडेट्‍स कॉलेजमध्ये परीक्षा दिली व उत्तीर्ण झाल्यानंतर भारतीय सैन्यात डेहराडून ट्रेनिंग सेंटरमध्ये झालेल्या ५ विशेष परीक्षामध्येही प्रकाश उत्तीर्ण झाला. प्रकाश भारतीय सैन्यात लेफ्टनंटपदी बढती मिळाल्‍यानंतर सध्‍या तो ईशान्य भारतात सेवेत आहे.

लहानपणापासून प्रकाश याला सैन्यात जाऊन देशाची सेवा करण्‍याची आवड होती. गरीब परिस्थितीमुळे अनेक अडचणींना सामोर जावे लागले. वडिलांनीही त्याला सैन्यात जाण्यासाठी मोलमजुरी करून शिक्षण दिले. शिक्षकांनीही त्याला वेळोवेळी मार्गदर्शन केले. सर्वांच्‍या आशीर्वादाने तो भारतीय सैन्यात दाखल झाला. त्‍यानंतर बढती मिळवत लेफ्टनंटपदी बढती मिळाली. देशातील प्रत्येक युवकाने सैन्‍यात दाखल होऊन देशसेवा करावी.
- प्रकाश सिदलानी, लेफ्‍टनंट

संबंधित बातम्या