महिलेच्या केसांवर थुंकल्यानंतर जावेद हबीबचा माफीनामा

Jawed Habib

Dainik Gomantak 

महिलेच्या केसांवर थुंकल्यानंतर जावेद हबीबचा माफीनामा

मी फक्त एकच बोलतो अन् ते ही मी मनापासून बोलतो. खरच कुणी दुखावलं असेल तर मला माफ करा. माफ करा, मी मनापासून माफी मागतो.

महिला ब्युटीशियनच्या तक्रारीवरुन हेअरस्टायलिस्ट जावेद हबीबविरुद्ध मन्सूरपूर पोलिस ठाण्यात महामारी अधिनियम आणि आपत्ती कायद्यातर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने सीएम पोर्टलवरही तक्रार नोंदवली होती.

जावेद हबीबने इंस्टाग्रामवर माफी मागितली

हेअरस्टायलिस्ट जावेद हबीबने (Jawed Habib) गुरुवारी रात्री उशिरा इंस्टाग्रामवर आपले मौन सोडले आहे. तो यावेळी म्हणाला, 'माझ्या सेमिनारमध्ये सहभागी झालेले लोक काही शब्दांनी आहेत. मी एकच सांगू इच्छितो की, आपल्याकडे जे सेमिनार होतात ते प्रोफेशनल सेमिनार होतात. मी फक्त एकच बोलतो अन् ते ही मी मनापासून बोलतो. खरच कुणी दुखावलं असेल तर मला माफ करा. माफ करा, मी मनापासून माफी मागतो.'

<div class="paragraphs"><p>Jawed Habib</p></div>
Viral Video: 'इस थूक में जान है' म्हणत जावेद हबीब महिलेच्या केसांवर थुंकला

स्वत:चा व्हिडिओ तयार करुन सोशल मीडियावर अपलोड केला

हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब कटिंग करताना थुंकत असतानाचा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसलेली महिला ब्युटीशियन देखील समोर आली आहे. तिने बरौत कोतवालीत तक्रार देऊन कारवाईची मागणी केली. हे प्रकरण मुझफ्फरनगर (Muzaffarnagar) मधील असल्याचे सांगून पोलिसांनी तिथे जाऊन रिपोर्ट दाखल करण्याचा सल्ला दिला आहे. यावर महिलेने सीएम पोर्टलवर तक्रार केली आहे. तसेच या प्रकरणाला दोन धर्मासंबंधी मुद्दा बनवू नका, मला न्याय द्या, असेही तिने सांगितले आहे.

सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असलेल्या हेअरस्टायलिस्ट जावेद हबीबच्या व्हिडिओमध्ये दिसणारी पूजा गुप्ता बरौत नगरची रहिवासी आहे. मीरापूर राजभेच्या ट्रॅकवर त्यांचे वंशिका नावाने ब्युटी पार्लर आहे. त्यांनी कोतवालीला सांगितले की, 3 जानेवारी रोजी मला मुझफ्फरनगरमधील एका सेमिनारमध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण आले होते. या चर्चासत्राला प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हेअर कटिंग शिकवण्याच्या नावाखाली जावेदने मला स्टेजवर बोलावून माझे डोके दाबले. कटिंग करताना तो दोनदा केसात थुंकला. पार्लरमध्ये पाण्याची कमतरता असल्यास केसांमध्ये थुंकून हेअर कटिंगही करु शकता, असे सांगितले. बघ माझी थुंकी किती मजबूत आहे. तिच्या पतीने याचा व्हिडिओही बनवला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com