Punjab Assembly Election Result 2022 : 'पॅड वूमन' ने सिद्धू आणि माजिठिया यांना चारली धूळ

Punjab Assembly Election Result 2022 : 'पॅड वूमन' अशी ख्याती असलेल्या कौर यांनी सिद्धू आणि माजिठिया या दोघांनाही हरवलं
Jeevanjyot Kaur
Jeevanjyot Kaurdainik gomantak

Punjab Assembly Election Result 2022 : पंजाबमधील सत्ताधारी असणाऱ्या काँग्रेसला धुळ चारत आम आदमी पक्षाने जोरदार मुसंडी मारत 92 जागांवर आघाडी घेतली आहे. तर सत्ताधारी असणाऱ्या काँग्रेसची केवळ 18 जागांवर आघाडी आहे. तर धक्कादायक म्हणजे काँग्रेसचे नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री (CM) चरणजितसिंह चन्नी (CharanjitSingh Channi) यांचा पराभव झाला असून पंजाबचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आप (AAP) ने देशाच्या राष्ट्रीय राजकारणात (politics) प्रवेश केला असून राष्ट्रीय पक्ष म्हणून आपली प्रतिमा बनवली आहे. तर नवज्योतसिंह सिद्धू यांच्या पराभवामुळे पंजाबच्या 'पॅड वूमन' चर्चेत आल्या आहेत. जीवनज्योत कौर यांनी नवज्योतसिंह सिद्धू आणि विक्रम माजिठिया यांना धूळ चारत आपला विजय खेचून आणला आहे. यामुळे त्यांच्याकडे 'जायंट किलर' म्हणून पाहिले जात आहे. (Jeevanjyot Kaur defeated Navjyot Singh Sidhu and Vikram Majithia)

पंजाब (Panjab) हा काँग्रेससाठी (Congress) बालेकिल्ला मानला जात होता. तर येथे काँग्रेसला (AAP) यश मिळेल असे वाटत होते. मात्र पंजाब काँग्रेसच्या हातातून निसटले असून सत्तेच्या चाव्या आप कडे गेल्या आहेत. येथे सगळ्यांना आचंबित करणारा निकाल लागला असून 'पॅड वूमन' (Pad Woman) म्हणून ओळख असणाऱ्या जीवनज्योत कौर यांनी पंजाब काँग्रेसच्या नवज्योत सिंह सिद्धू यांच्यासह अकाली दलाच्या (Akali Dal) विक्रम माजिठिया यांचाही अमृतसर (Amritsar) पूर्व या मतदारसंघामध्ये पराभव केला.

Jeevanjyot Kaur
Assembly Election Result live: 'गोवेकरांनी विकासाला मत दिलं'

येथे फक्त नवज्योत सिंह सिद्धू आणि विक्रम माजिठिया यांच्यात लढत आहे, असे चित्र निर्माण करण्यात आले होते पण सिद्धू आणि माजिठिया यांच्या भांडणात तिसऱ्या चा लाभ या म्हणीप्रमाणे कौर यांचा विजय झाला. जीवनज्योती कौर या पंजाबमधील तुरुंगातील महिला (female prisons) कैद्यांना सॅनिटरी पॅड (Sanitary pads) देण्याचे काम करतात. तसेच त्यागरिबांच्या कल्याणासाठी ही झटत असतात.

पंजाबच्या जनतेचा जनादेश नम्रपणे स्वीकर

यानंतर काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी आपला पराभव स्वीकारताना आपचे अभिनंदन केले आहे. तसेच ट्विट करत, जनतेचा आवाज हा देवाचा आवाज आहे. आपण पंजाबच्या जनतेचा जनादेश नम्रपणे स्वीकारतो. अभिनंदन!' असे म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com