आशियातील सर्वात मोठे जेवार विमानतळ, पंतप्रधानांच्या हस्ते आज भूमिपूजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) गुरुवारी दुपारी 1 वाजता उत्तर प्रदेशातील जेवार (Jewar Airport) येथे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाची (NIA) पायाभरणी करतील.
आशियातील सर्वात मोठे जेवार विमानतळ, पंतप्रधानांच्या हस्ते आज भूमिपूजन
Jewar Airport will be the largest airport in AsiaDainik Gomantak

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) गुरुवारी दुपारी 1 वाजता उत्तर प्रदेशातील जेवार (Jewar Airport) येथे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाची (NIA) पायाभरणी करतील. NIA उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगरमधील जेवर येथे आहे, जे दिल्लीपासून सुमारे 80 किमी अंतरावर आहे. विमानतळाचा पहिला टप्पा 10,050 कोटी रुपये खर्चून विकसित केला जात आहे.

जेवार विमानतळ 1300 हेक्टर जमिनीवर पसरलेले असून त्याचा पहिला टप्पा 2024 पर्यंत पूर्ण होईल. वर्षाला सुमारे 12 दशलक्ष प्रवाशांना हाताळण्याची क्षमता असेल. चारही टप्पे पूर्ण झाल्यानंतर ही क्षमता वाढून 70 दशलक्ष प्रवासी होणार आहे. सुरुवातीला जेवार विमानतळावर दोन हवाई पट्ट्या कार्यरत असतील. या विमानतळाच्या विकासाचे कंत्राट ज्यूरिख एअरपोर्ट इंटरनॅशनलला देण्यात आले आहे.

Jewar Airport will be the largest airport in Asia
मेघालयात ममता दीदींचा काँग्रेसला दे धक्का, 12 आमदारांचा तृणमुलमध्ये प्रवेश

नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बांधकामामुळे, उत्तर प्रदेश हे पाच आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारे भारतातील एकमेव राज्य बनेल. तमिलनाडू आणि केरळ ही देशातील एकमेव राज्ये आहेत जिथे 4-4 आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. नुकतेच कुशीनगरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाले आहे. अयोध्येतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू आहे. हा विमानतळ दिल्ली NCR मध्ये बांधला जाणारा दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल. यामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI) गर्दी कमी होण्यास मदत होईल.

नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ग्राउंड ट्रान्सपोर्टेशन सेंटर विकसित केले जाईल, ज्यामध्ये मल्टी-मॉडल ट्रान्झिट सेंटर, मेट्रो आणि हायस्पीड रेल्वेसाठी स्टेशन, टॅक्सी, बस सेवा आणि खाजगी वाहन पार्किंग सुविधा उपलब्ध असेल. मेट्रो सेवेद्वारे विमानतळही जोडले जाणार आहे. यासह यमुना एक्सप्रेस वे, वेस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेस वे, ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेस वे, दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे देखील विमानतळाशी जोडले जाणार आहेत.

नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातील पहिले विमानतळ असेल जिथे उत्सर्जन निव्वळ शून्य असेल. विमानतळाचा काही भाग प्रकल्पाच्या जागेवरून काढण्यात येणारी झाडे लावण्यासाठी वापरला जाईल. पीएमओच्या म्हणण्यानुसार, पहिल्या टप्प्यासाठी भूसंपादन आणि बाधित कुटुंबांच्या पुनर्वसनाशी संबंधित काम पूर्ण झाले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com