Jharkhand: लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या 501 जोडप्यांचा सामूहिक विवाह, जाणून घ्या झारखंडमधील 'ही' अनोखी परंपरा!

Jharkhand: झारखंडच्या खुंटी जिल्ह्यात वर्षानुवर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या 501 जोडप्यांचा सामूहिक विवाह लावण्यात आला.
Marriage
MarriageDainik Gomantak

Mass Marriage in Jharkhand: झारखंडच्या खुंटी जिल्ह्यात वर्षानुवर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या 501 जोडप्यांचा सामूहिक विवाह लावण्यात आला.

यावेळी केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा आणि त्यांच्या पत्नी मीरा मुंडा प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या विवाहात (Marriage) 20 ते 70 वयोगटातील स्त्री-पुरुष होते. अनेक विवाहित जोडपे पालक बनल्याचे सांगण्यात येत आहे.

या सोहळ्यात त्यांची मुलेही त्यांच्या लग्नाची साक्षीदार होती. वृष्टी ग्रीन फार्मर्स या स्वयंसेवी संस्थेने या सोहळ्याचे आयोजन केले होते.

दरम्यान, आदिवासी भागात लिव्ह-इनच्या नात्याला 'ढुकु' म्हणतात. अशी जोडपी अनेक वर्षे एकाच छताखाली एकत्र राहूनही त्यांच्या नात्याला लग्नाचे नाव देऊ शकत नाहीत.

ढुकु परंपरेमागील सर्वात मोठे कारण म्हणजे आर्थिक मजबुरी. खरे तर, आदिवासी समाजात लग्नाच्या निमित्ताने संपूर्ण गावाला मेजवानी दिली जाते, ही अनिवार्य परंपरा आहे. मेजवानीसाठी, मांस आणि तांदूळ सोबत शीतपेयांची व्यवस्था करावी लागते.

गरिबीमुळे अनेकांना अशी व्यवस्था करता येत नाही. त्यामुळे ते लग्न न करता एकत्र राहायला लागतात.

अशा जोडप्यांपैकी बहुतेक जोडप्यांना मुलेही आहेत, परंतु समाजाच्या प्रथेनुसार लग्न न केल्यामुळे या मुलांना जमीन-मालमत्तेवर हक्क मिळत नाही. अशा मुलांना वडिलांचे नावही लावता येत नाही.

Marriage
Jharkhand News: ह्रदयद्रावक! पोलिस गेले छापा मारायला अन् चार दिवसांचे बाळ बुटाने चिरडले

तसेच, ढुकु या शब्दाचा अर्थ प्रवेश करणे असा होतो. यानुसार, जेव्हा एखादी स्त्री लग्न न करता पुरुषाच्या घरात प्रवेश करते, म्हणजेच राहू लागते, तेव्हा तिला 'ढुकनी' म्हणतात.

अशा जोडप्यांना ढुकु म्हणतात. आदिवासी समाज अशा महिलांना (Women) सिंदूर लावूही देत ​​नाही. आता वर्षानुवर्षे एकत्र राहणाऱ्या जोडप्यांना सामाजिक आणि कायदेशीर मान्यता मिळवून देण्याची मोहीम तीव्र झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com