Dhanbad Fire: धनबादमध्ये भीषण अग्निकांड, 10 महिला अन् तीन मुलांसह 14 जणांचा मृत्यू

Dhanbad Apartment Fire: झारखंडमधील धनबाद येथील एका अपार्टमेंटमध्ये मंगळवारी भीषण आग लागली. जोरफाटक येथील आशीर्वाद अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली.
Dhanbad Fire
Dhanbad FireTwitter/ ANI

Fire in Dhanbad: झारखंडमधील धनबाद येथील एका अपार्टमेंटमध्ये मंगळवारी भीषण आग लागली. जोरफाटक येथील आशीर्वाद अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली. अपार्टमेंटमध्ये अनेक लोक अडकले आहेत. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला.

दरम्यान, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात 20 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. 15 जणांची सुटका करण्यात आली आहे. आताही लोकांची सुटका केली जात आहे.

Dhanbad Fire
CBI अ‍ॅक्शन मोडमध्ये, 7 राज्ये अन् केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुमारे 50 ठिकाणी छापे

यापूर्वी, पश्चिम बंगालची (West Bengal) राजधानी कोलकाता येथील एका गोदामाला आग लागली होती. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणली.

अग्निशमन सेवेचे संचालक अभिजीत पांडे म्हणाले की, "अग्निशामक इंजिन तैनात करण्यात आले असून आग आटोक्यात आणण्यात आली आहे." इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या बुटाच्या दुकानात ही आग लागली. काही जण अडकले असून त्यांची सुटका करण्यात आली आहे. यात कोणी जखमी झाल्याची माहिती नाही.

Dhanbad Fire
ईडी अ‍ॅक्शन मोडमध्ये, PFI अन् रिहॅब इंडिया फाउंडेशनची गोठवली 33 बँक खाती

दुसरीकडे, उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) राजधानी लखनऊमधील बादशाह नगर मेट्रो स्टेशनच्या ई-रिक्षाच्या गोदामाला भीषण आग लागली. लखनौचे डीएम सूर्यपाल गंगवार म्हणाले की, 'बॅटरीचे काम सुरु असलेल्या खोलीत आग लागली. आग आटोक्यात आणण्यात आली आहे. बॅटरीच्या दुकानात काम करणाऱ्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर इतर सर्व लोकांची सुटका करण्यात आली आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com