Godda Mini Goa: झारखंडमधील शहरात साकारला मिनी गोवा; वाळूच्या किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी...

उन्हाळ्यातील पर्यटनासाठी स्थानिकांचे प्राधान्य; झाडी, तलावाचे आकर्षण
Godda Mini Goa in Jharkhand
Godda Mini Goa in Jharkhand Dainik Gomantak

Godda Mini Goa in Jharkhand: गोवा हे देशभरातील पर्यटकांचे आवडते डेस्टिनेशन आहे. तथापि, प्रत्येकाला गोव्याला यायला शक्य होईल, असे नसते. त्यामुळे मग गोव्यासारखा अनुभव देणाऱ्या जवळच्या स्थळांकडेही पर्यटक धाव घेत असतात. झारखंडमध्ये देखील असाच एक मिनी गोवा साकारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Godda Mini Goa in Jharkhand
Goa Police: कौतुकास्पद! गोवा पोलिसांनी शस्त्रक्रियेसाठी वेळेत पोहचवले यकृत; गोमॅको ते दाबोळी ग्रीन कॉरिडॉर

झारखंडमधील एका शहरात वाळूचा किनारा साकारला असून तिथे आता पर्यटकांचीही गर्दी होऊ लागली आहे. हा भाग मिनी गोवा म्हणून नावारूपाला येत आहे.

गोड्डा असे या शहराचे नाव असून येथील लालमाटिया या गावात पर्यटकांना गोव्याच्या बीचप्रमाणे अनुभूती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. येथे असलेल्या सुंदर तलावामुळे आणि आजूबाजूच्या दृश्यांमुळे याला मिनी गोवा असेही म्हणतात.

गोव्याला जायची, गोवा पाहायची खूप इच्छा असलेले पण विविध कारणांनी गोव्याला जायची संधी अद्याप न मिळालेले अनेक पर्यटक येथे धाव घेत आहेत. वीकेंडच्या आणि सुट्ट्यांच्या दिवशी तर या परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी असते.

Godda Mini Goa in Jharkhand
Rumdamol Panchayat: रुमडामळ येथील मदरशाला स्थानिकांचा विरोध कायम; पंच सदस्याच्या वक्तव्यावरून नव्या वादाला सुरुवात

तलावाभोवती डोंगराच्या आकाराचा ढिगारा आहे. या ढिगाऱ्याखालची वाळू आणि तलावाचा किनारा या भागाला गोव्याच्या समुद्र किनाऱ्यांची अनुभूती देतो, असे सांगितले जात आहे. या तलावाच्या आजूबाजूला झाडे असल्याने येथे नेहमीच थंड वारे वाहत असतात.

उन्हाळ्याच्या सुटीत जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून लोक येथे सहलीसाठी येत आहेत. गोड्डा येथून मोहनपूरला बसने किंवा खाजगी वाहनाने जाता येते. मिनी गोवा मोहनपूरपासून लालमाटिया मार्गे फक्त 3 किलोमीटर अंतरावर आहे.

येथे टोटो रिक्षानेदेखील जाता येऊ शकते. सध्या हे केंद्र येथील पर्यटकांसाठीचे मुख्य आकर्षण ठरले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com