भारताच्या या दोन शहरांमध्ये बसविण्यात आले जिओ आणि एअरटेलचे 5 जी टॉवर्स

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 8 मार्च 2021

रिलायन्सच्या जिओ आणि भारती एअरटेल च्या मते 5 जी लवकरच लॉन्च केल्या जाणार आहे. परंतु आपण या अहवालानुसार विचार केला तर 2022 पूर्वी ते शक्य होणार नाही. 

नवी दिल्ली:  रिलायन्सच्या जिओ आणि भारती एअरटेल च्या मते 5 जी लवकरच लॉन्च केल्या जाणार आहे. परंतु आपण या अहवालानुसार विचार केला तर 2022 पूर्वी ते शक्य होणार नाही. गेल्या वर्षी मुकेश अंबानीच्या रिलायन्स जिओने सांगितले की ते 2021 च्या मध्यापर्यंत 5 जी सेवा सुरू केली जाईल. परंतु जेव्हा सरकार स्पेक्ट्रमला लिलावासाठी आणेल तेव्हाच दोन्ही कंपन्या हे करू शकतील. असलं तरी जागतिक नेटवर्क मोजणारी ओकला ही सेवा पुरविते. त्यानंतर एअरटेल आणि जिओचे 5 जी टॉवर्स यापूर्वीच भारतातील 2 शहरांमध्ये स्थापित केले गेले आहेत.

जिओचा 5 जी टॉवर मुंबईत सेटअप करण्यात आला आहे, तर हैदराबादमध्ये एअरटेलचा 5 जी टॉवर बसविण्यात आला आहे. हे टॉवर्स प्री रिलीज प्रकारात ठेवले गेले आहेत. संपूर्ण जगात एकूण 21,996 टॉवर्स आहेत. ओकला म्हणाले की हे सर्व टॉवर्स सध्या चाचणीच्या टप्प्यात असून ग्राहक त्यांचा वापर करु शकत नाहीत. पण जानेवारीच्या शेवटी भारती एअरटेलने हैदराबादमध्ये 5 जी चाचणी पूर्ण केल्याचे म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिन: आज टीकरी बॉर्डरवर बसंती पेहरावात दिसणार शेतकरी महिला 

दूरसंचार मंत्रालयाने नुकताच स्पेक्ट्रम लिलाव 2021 आयोजीत केला होता. जेथे प्रीमियम 700 मेगाहर्ट्झ बँड अद्याप विकला गेलेला नाही. अशा परिस्थितीत भारतात 5 जी स्पेक्ट्रमचा लिलाव कधी होणार याबद्दल माहिती नाही. तेव्हा 5 जी अद्याप 8 महिने दूर आहे असे म्हणायला हरकत नाही. एअरटेलने कमर्शीयल 5 जी चाचण्यांचे उदाहरण दिले ज्यामध्ये कंपनीने 1800 मेगाहर्ट्झ बँडवर स्पेक्ट्रम वापरला. एनएसए नेटवर्क तंत्रज्ञानाच्या मदतीने हे शक्य झाले.

मराठा आरक्षणावरील पुढील सुनावणी 15 मार्चला 

 

संबंधित बातम्या