J & K : प्रशासनाची कमाल, शोपियान जिल्ह्यात 45 वर्षांवरील लोकांचे 100 टक्के लसीकरण पूर्ण

दैनिक गोमंतक
मंगळवार, 25 मे 2021

आकडेवारीनुसार, शोपियान जिल्ह्यात सोमवारपर्यंत 45 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील 68953 लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला असून, जिल्ह्यातील या वर्गातील 100 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.

जम्मू कश्मीर : कोरोना (Covid-19) लसीकरणाबाबत एक चांगली बातमी समोर आली आहे. दक्षिण कश्मीरमधील शोपियामध्ये 45 वर्षांच्यावरील लोकांचे 100 टक्के लसीकरण (Vaccination) पूर्ण झाले आहे. जम्मू कश्मीर (Jamukashmir) प्रशासनाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. जम्मू कश्मीरमधील सांबा जिल्ह्या लसीकरणाचे टारगेट (Target) पूर्ण करणारा पहिला जिल्हा बनला आहे. 

आकडेवारीनुसार, शोपियान जिल्ह्यात सोमवारपर्यंत 45 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील 68953 लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला असून, जिल्ह्यातील या वर्गातील 100 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.  जिल्ह्यात एकूण 78883 लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यामध्ये 2334 आरोग्य कर्मचारी आणि 7546 फ्रंट लाइन वर्कर्स  यांचा समावेश आहे.   जिल्ह्यातील सर्वप्रथम लसीकरणाचे काम शोपियान जिल्हा मुख्यालयापासून दहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हिरपोरा गावात पूर्ण झाले. मागील वर्षी पहिल्या लाटेत हिरपोरा गावाला चांगलाच त्रास झाला होता. गावातील 450 लोकांना कोरोनाची लागण झाली होती. 

सिप्लाची कोविड -19 टेस्टिंग कीट आजपासून बाजारात उपलब्ध

हिरपोराचे  वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद युसुफ सांगितले, या भागातील 98% लोकांना लसीकरण करण्यात आले आहे. आता  18 ते 44 वर्षांच्या मुलांचे लसीकरण करण्यात येत आहे. या परिसरातील लोकांना याचे श्रेय देत जाते त्यांना साथीचे रोग आणि लस या दोन्ही गोष्टींबद्दल अधिक जागरूकता आहे. दुसर्‍या लाटेपूर्वीच प्रशासनाने पावले उचलत गावातील सर्वांचे लसीकरण केले. याचा परिणाम म्हणून कोरेनाच्या दुसऱ्या लटेपासून हिरपोरा गाव सुरक्षित राहिले.

 

संबंधित बातम्या