सनकी माणूस.. कात्रीने वार करून पत्नीची हत्या केली आणि तिथेच व्हिडिओ गेम खेळत बसला

गोमंतक ऑनलाईन टीम
बुधवार, 9 डिसेंबर 2020

कात्रीने अनेक वार करून पत्नीची हत्या करणाऱ्या एकाला जोधपूर पोलिसांनी अटक केली आहे. हत्या केल्यानंतर स्वत:च त्याने पोलिसांना माहिती दिली.

जोधपूर- कात्रीने अनेक वार करून पत्नीची हत्या करणाऱ्या एकाला जोधपूर पोलिसांनी अटक केली आहे. हत्या केल्यानंतर स्वत:च त्याने पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यावर पत्नीच्या रक्ताने माखलेल्या शरीराजवळ आरोपी व्हिडिओ गेम खेळत असल्याचे धक्कादायक दृश्य पोलिसांच्या निदर्शनास आले. 

काय आहे प्रकरण?  

जोधपूरमधील महामंदिर पोलिस ठाणे परिसरातील बीजेस कॉलनीमध्ये राहणाऱ्या विक्रम सिंह याचे रविवारी पत्नी शिव कंवरशी भांडण झाले. त्याला झटके येत असल्याने तो अचानक रात्री झोपेतून उठला आणि त्याने पत्नीची हत्या केली. कात्रीने तिच्या शरीरावर वार करून त्याने पत्नीला ठार मारले. त्याने असे का केले यामागील कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस घटनेचा तपास करत आहेत.
 
 विक्रम सिंह याचे कुटुंब मुळचे राजस्थानमधील फलोदी येथील आहे. मात्र, गेल्या कित्येक वर्षांपासून ते येथील बीजेएस कॉलनीत वास्तव्यास आहेत. विकास अनेक दिवसांपासून बेरोजगार आहे. पत्नी याआधी घरातूनच शिलाईचे काम करायची. त्यानंतर ती एका सहकारी स्टोअरमध्ये काम करायला लागली. मात्र, विक्रमला तिच्या सहकारी स्टोअरमध्ये काम करण्याला आक्षेप होता.

एका रिपोर्टनुसार मृत शिव कंवर यांचे बंधू मांगू सिंह यांनी आरोपी विक्रमवर अनेक आरोप केले. विक्रम याआधीही तिला पैश्यांसाठी मारहाण करायचा. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे त्यांचेही पालन पोषण आपण करत असल्याचे मांगू यांनी सांगितले. शिव कंवर यांनी विक्रम सिंह यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.     

 

संबंधित बातम्या