Joshimath Satellite Images: जोशीमठ येथे 12 दिवसात 'इतकी' जमीन खचली, ISRO ची सॅटेलाईट छायाचित्रे तुम्हाला थक्क करतील

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) अहवालानुसार उत्तराखंडमधील जोशीमठ परिसर अवघ्या 12 दिवसांत 5.4 सेमी वेगाने खचले आहे.
Joshimath ISRO Satellite Images
Joshimath ISRO Satellite ImagesDainik Gomantak

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) अहवालानुसार उत्तराखंडमधील जोशीमठ परिसर अवघ्या 12 दिवसांत 5.4 सेमी वेगाने खचले आहे. इस्रोच्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरने प्रसिद्ध केलेल्या उपग्रह प्रतिमांमध्ये 27 डिसेंबर ते 8 जानेवारी दरम्यान शहर 5.4 सेमी खचल्याचे दाखवण्यात आले आहे.

अहवालात म्हटले आहे की, 2 जानेवारी 2022 पासून सुरू झालेल्या या घटनेमुळे मोठ्या प्रमाणावर जमीन घसरली असून आता ती 12 दिवसात तब्बल 5.4 सेमीने ही घसरण सुरू आहे. आर्मी हेलिपॅड आणि नरसिंग मंदिराचा समावेश असलेल्या मध्य जोशीमठमध्ये मातीची अतिशय वेगाने घसरण झाली आहे. ISRO ने दिलेल्या माहितीनुसार, जोशीमठ-औली रस्त्याजवळ 2180 मीटर उंचीवर आहे.

Joshimath ISRO Satellite Images
Sharad Yadav Died: ज्येष्ठ समाजवादी नेते शरद यादव यांचे निधन

ISROला असेही आढळून आले की मागील काही महिन्यांमध्ये म्हणजेच एप्रिल ते नोव्हेंबर 2022 दरम्यान हे खचण्याचे प्रमाण खूपच कमी होते. जोशीमठ शहरामध्ये 9 सेमी पर्यंत मंद गतीने खचल्याची नोंद एप्रिल ते नोव्हेंबर 2022 दरम्यान 7 महिन्यांच्या कालावधीत झाली आहे, असे अहवालात सांगण्यात आले आहे.

ISROने दिलेली जोशीमठ खचल्याची छायाचित्रे

ही छायाचित्रे कार्टोसॅट-2एस उपग्रहावरून घेण्यात आली आहेत. मंदिर-नगर म्हणून ओळखले जाणारे जोशीमठ यावर्षी इमारतींना आणि रस्त्यांना मोठ्या प्रमाणात तडे गेल्याने संकटात आले. सॅटेलाइट सर्वेक्षणानंतर सुमारे 4,000 लोकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे.

इथे पहा जोशीमठ खचल्याची छायाचित्रे :

Joshimath ISRO Satellite Images
Joshimath ISRO Satellite ImagesDainik Gomantak
Joshimath ISRO Satellite Images
Joshimath ISRO Satellite ImagesDainik Gomantak

हॉटेल आणि व्यावसायिक आस्थापनांव्यतिरिक्त, 678 घरे धोक्यात आहेत, असे उत्तराखंड सरकारने म्हटले आहे. काही इमारती अनिश्चितपणे खचल्या आहेत, ज्यामुळे लगतच्या इमारतींना धोका निर्माण झाला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, ज्यांनी जोशीमठला भेट दिली आणि गुरुवारी स्थानिक आणि तज्ञांशी बैठका घेतल्या. त्यावेळी ते म्हणाले की एक समिती भागधारकांचे हित लक्षात घेऊन पीडित कुटुंबांना भरपाईचा दर ठरवेल.

सध्या, प्रत्येक बाधित कुटुंबाला ₹ 1.5 लाख दिले जातील. हे फक्त तात्पुरते उपाय आहे. आम्ही अजूनही नुकसानभरपाई दरांवर काम करत आहोत, असे ते म्हणाले.

Joshimath ISRO Satellite Images
Joshimath ISRO Satellite ImagesDainik Gomantak

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही त्यांच्या घरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आरके सिंह, भूपेंद्र यादव आणि गजेंद्र सिंह शेखावत आणि वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांसमवेत परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एका उच्चस्तरीय बैठक घेतली होती.

महत्वाची बाब म्हणजे ही आपत्ती फक्त जोशीमठपुरती मर्यादित नाही. जोशीमठचे प्रवेशद्वार म्हणून पाहिले जाणारे शहर कर्णप्रयाग आणि परिसरात गेल्या काही महिन्यांत कमीतकमी 50 घरांमध्ये मोठ्या भेगा पडल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com