नक्षलवाद्यांचा पत्रकाराला फोन; म्हणाले, "जवानाला लवकरच सोडू"

दैनिक गोमंतक
बुधवार, 7 एप्रिल 2021

सीआरपीएफचा एक जवान बेपत्ता असल्याचे समजते आहे. बेपत्ता झालेल्या या जवानाबद्दल एक महत्वाचा फोन कॉल छत्तीसगडच्या एका पत्रकाराला आला असल्याचे समोर आले आहे.

शनिवारी 3 एप्रिल रोजी छत्तीसगडच्या बीजापूर गावाजवळ असलेल्या भागात नक्षलवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर हल्ला केला होता. यावेळी जवानांनी देखील प्रत्युत्तरादाखल कारवाई केली आणि या चकमकीत केंद्रीय राखीव दलाचे 22 जवान शहीद झाले असून 32 जवान जखमी झाले आहेत. मात्र याच घटनेत सीआरपीएफचा एक जवान बेपत्ता असल्याचे समजते आहे. बेपत्ता झालेल्या या जवानाबद्दल एक महत्वाचा फोन कॉल छत्तीसगडच्या एका पत्रकाराला आला असल्याचे समोर आले आहे. (Journalist Ganesh Mishra Said I Received two calls from Naxal )

भारत-चीन संबंध: पुन्हा लष्करी पातळीवर चर्चा होण्याची शक्यता

छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) झालेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात (Naxal Attack) बेपत्ता असलेला  जवान आमच्या ताब्यात असून त्याला लवकरच आम्ही सोडणार आहोत, अशा आशयाचा  फोन छत्तीसगडच्या बीजापूरमधील  एका पत्रकाराला आल्याची माहिती समोर येते आहे. शनिवारी झालेल्या घटनेतील एक जवान आपल्या ताब्यात असून जवानाच्या सुटकेबद्दलची माहिती देणारे 2 फोन आपल्याला आल्याची माहिती पत्रकार गणेश मिश्रा यांनी माध्यमांना दिली आहे. "सीआरपीएफचा (CRPF) एक जवान आमच्या ताब्यात आहे. गोळी लागल्याने हा जवान जखमी झालेला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. येत्या 2 दिवसांत या जवानाला सोडण्यात येईल तसेच लवकरच त्या संबंधितचे फोटो आणि व्हिडीओ देखील समोर  येतील" असे त्या फोन द्वारे आपल्याला सांगण्यात आले असल्याचा दावा पत्रकार गणेश मिश्रा यांनी केला आहे. तसेच 'जवान आमच्या ताब्यात असून आम्ही सरकार सोबत चर्चेस तयार असल्याचे' एक पत्रदेखील नक्षलवाद्यांकडून समोर आले असल्याचे समजते आहे.   

दरम्यान, या घटनेननंतर केंद्रीय गृहविभागाने गंभीर दाखल घेतली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील घटना स्थळी भेट दिली. या घटनेत शहीद झालेल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही अश्या भावना अमित शाह यांनी व्यक्त केल्या आहेत. तसेच केंद्रीय गृहविभाग नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई करणार असल्याच्या शक्यता केंद्रीय स्तरावरील सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चे  नंतर वर्तवल्या जात आहेत.  

संबंधित बातम्या