Mission 2024 साठी भाजपने लॉन्च केले ‘बस्ती संपर्क अभियान’, ठेवले हे लक्ष्य

Modi Government: मोदी सरकारच्या योजना योग्य रीतीने राबवल्या जातील याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
 J.P. Nadda
J.P. NaddaDainik Gomantak

BJP National President J.P. Nadda: भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी शनिवारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना गरीब आणि दीनदुबळ्यांसोबत काम करण्यास आणि पक्षाशी असलेले नाते अधिक दृढ करण्याचे आवाहन केले आहे. मोदी सरकारच्या योजना योग्य रीतीने राबवल्या जातील याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

दरम्यान, करोलबागमध्ये बस्ती संपर्क अभियानाला संबोधित करताना नड्डा म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) म्हणतात की, जनता ही आपली ताकद आहे. गोरगरीब आणि शोषितांबरोबर आपण काम केले पाहिजे.'

 J.P. Nadda
ऐतिहासिक राजपथ आता 'कर्तव्य पथ' म्हणून ओळखला जाणार, मोदी सरकार बदलणार नाव

तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध ठिकाणी 'सेवा पखवाडा' कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल नड्डा यांनी शनिवारी भाजप कार्यकर्त्यांचे कौतुक केले.

नड्डा पुढे म्हणाले की, 'पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून क्षयरोगग्रस्त रुग्णांना पोषण किटचे वाटप करण्यात आले आहे.' नड्डा पुढे असेही म्हणाले की, 'मी स्वतः 11 टीबी रुग्णांची काळजी घेण्याचे ठरवले आहे. 'संपर्क अभियाना'द्वारे पक्षाचे कार्यकर्ते 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देशभरातील 70,000 झोपडपट्ट्यांना भेट देतील.'

 J.P. Nadda
मोदी सरकार देणार 8 हजार कर्मचाऱ्यांना पदोन्नती, आरक्षणाचा मिळणार लाभ

तसेच, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, आयुष्मान भारत योजना आणि शौचालये बांधणे यासह मोदी सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा संदर्भ देत नड्डा म्हणाले की, या योजनांची अंमलबजावणी कशी होते हे पाहण्यासाठी भाजप (BJP) कार्यकर्त्यांनी झोपडपट्टीत जाऊन पाहणे आवश्यक आहे.

शेवटी नड्डा म्हणाले की, 'मोदी सरकारच्या (Modi Government) विविध कल्याणकारी योजनांचे लाभार्थी मोठ्या संख्येने अनुसूचित जातीचे आहेत.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com