"भाजपमध्ये सिंधिया बॅकबेंचर, कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाही"

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 9 मार्च 2021

 कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी म्हटले की, ज्योतिरादित्य सिंधिया भाजपमध्ये राहून कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत आणि त्यांना पुन्हा कॉंग्रेसमध्ये परत यावे लागेल.

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी म्हटले की, ज्योतिरादित्य सिंधिया भाजपमध्ये राहून कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत आणि त्यांना पुन्हा कॉंग्रेसमध्ये परत यावे लागेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल यांनी भारतीय युवा कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हे वक्तव्य केलं. राहुल गांधी बैठकीत म्हणाले, मी सिंधिया यांना सांगितलं होतं, तुम्ही कठोर परिश्रम करा, एक दिवस तुम्ही निश्चितपणे मुख्यमंत्री व्हाल." पुढे राहुल गांधी म्हणाले, "सिंधिया हे भाजपमधील बॅकबेन्चर आहेत.  तुम्ही लिहून घ्या, सिंधिया भाजपमध्ये कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत. त्यांना येथे परत यावे लागेल."

Batla House Encounter: अरिझ खानला दिल्ली न्यायालयाने ठरवलं दोषी

कॉंग्रेस नेत्यांबरेबर झालेल्या वादानंतर ज्योतिरादित्य सिंधियांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सिंधियांना पाठिंबा दिलेल्या 20 हून अधिक आमदारांनी कॉंग्रेस सोडल्यानंतर कमलनाथ यांच्या नेतृत्वातील कॉंग्रेसचे सरकार पडले. युवक कॉंग्रेसच्या बैठकीत संघटनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राहुल गांधींना पुन्हा एकदा पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत राहुल गांधी यांनी या संघटनेच्या कार्याचे कौतुक केले आणि युवा कॉंग्रेसच्या अधिकाऱ्यांना पक्षाची विचारधारा वाढविण्यासाठी आणि आरएसएसपुढे न झुकता काम करण्याचे आवाहन केले.

ग्रामीण भागातील महिलांना उद्योजक बनवण्यासाठी गुगल करणार मदत

युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बिवी यांनी राहुल गांधींना या बैठकीत अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्षपद भूषविण्याची विनंती केली यावर तेथील अधिकाऱ्यांनी टाळ्या वाजवून त्याचे समर्थन केले. युवक कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांच्या विनंतीला राहुल गांधींनी प्रतिसाद दिला नाही, असे सूत्रांनी सांगितले.
 

संबंधित बातम्या