ज्योतिरादित्य म्हणाले, काँग्रेसला मतदान करा

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपवासी झालेले आणि सध्या मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकीत भाजपला विजयी करण्यासाठी प्रचारसभांचा धडाका लावलेले खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी एका सभेत लोकांना काँग्रेसला मतदान करा, असे आवाहन केले.

भोपाळ : काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपवासी झालेले आणि सध्या मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकीत भाजपला विजयी करण्यासाठी प्रचारसभांचा धडाका लावलेले खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी एका सभेत लोकांना काँग्रेसला मतदान करा, असे आवाहन केले. त्यांच्या या भाषणाचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. 

मध्य प्रदेशात तीन नोव्हेंबरला विधानसभेच्या २८ जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. ग्वाल्हेरमधील दाबरा गावात भाजपच्या उमेदवार इमरती देवी यांच्यासाठी प्रचार करताना ज्योतिरादित्य म्हणाले की, ‘दाबरामधील माझ्या मतदारांनो, तुमचा हात वर करा, शिवराजसिंह चौहान आणि मला पटवून द्या की तुम्ही तीन नोव्हेंबरला ‘हाता’समोरचेच बटन दाबाल.’ त्यांच्या या वाक्यावर सगळे अवाक झाले. मात्र, ज्योतिरादित्यांनी तातडीने आपल्या वाक्यात सुधारणा करत ‘कमळ’ चिन्हाच्या समोरील बटन दाबण्याची विनंती लोकांना केली. मात्र, या चुकीचा फायदा काँग्रेसने  उठवला. 

संबंधित बातम्या