Kaali Poster Controversy: TMC खासदार महुआ मोईत्राविरोधात FIR दाखल

महुआ मोइत्रा यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर तृणमूल काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला नाही.
Kaali Poster Controversy: TMC खासदार महुआ मोईत्राविरोधात FIR दाखल

Kaali Poster Controversy: तृणमूल काँग्रेसच्या (Trinmool Congress) खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांच्या विरोधात काली (Kaali) वादावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह ईस्ट 2022 मध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांनी काली संदर्भात वक्तव्य केले.

खरं तर, इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह ईस्ट 2022 मध्ये उपस्थित असताना, तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी 'काली' या माहितीपटाच्या पोस्टरवर बोलताना म्हटलं की, "मॉं कालीची अनेक रूपं आहेत. माझ्यासाठी काली म्हणजे मांस प्रेमी, आणि मद्य पिणारी देवी आहे. लोकांची मते भिन्न आहेत, मला त्यात काही अडचण नाही."

Kaali Poster Controversy: TMC खासदार महुआ मोईत्राविरोधात FIR दाखल
Kaali Poster: देवी कालीचा अपमान केल्या प्रकरणी निर्माती लीना मणिमेकलाईवर गुन्हा दाखल

खासदारांच्या वक्तव्यापासून तृणमूल काँग्रेसने स्वतःला दूर केले

महुआ मोइत्रा यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर तृणमूल काँग्रेसने पाठिंबा दिला नाही. यावर नाराजी व्यक्त करत मोइत्रा यांनी टीएमसीचे अधिकृत ट्विटर हँडल अनफॉलो केले आहे. मात्र तरीही त्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना ट्विटरवर फॉलो करत आहे. काली चित्रपटाच्या पोस्टरमध्ये मॉं काली सिगारेट ओढताना दाखवण्यात आली होती. यासोबतच तिच्या एका हातात त्रिशूलही दाखवण्यात आला आहे. चित्रपट निर्मात्या लीना मनिमेकलाई यांचा हा चित्रपट सध्या वादाच्या कचाट्यात सापडला आहे.

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्यावर मध्य प्रदेशात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काली या चित्रपटाच्या संदर्भात त्यांनी देवी कालीबद्दल वादग्रस्त विधान केले होते. महुआ मोइत्रा यांच्या वक्तव्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे. हिंदू देवतांचा अपमान कोणत्याही किंमतीत खपवून घेतला जाणार नाही, असे ते म्हणाले.

Kaali Poster Controversy: TMC खासदार महुआ मोईत्राविरोधात FIR दाखल
'माझ्यासाठी माॅं काली ही मांसाहार करणारी, मद्य पिणारी देवी...': महुआ मोइत्रा

कोणत्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला

राजधानी भोपाळमध्ये टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांच्या विरोधात आयपीसीच्या कलम 295A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी हे कलम लावण्यात आले आहे. याआधी जबलपूरमध्ये भाजप आमदाराच्या मुलाने चित्रपट निर्मात्या लीना मणिमेकलाई यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. भारतीय जनता युवा मोर्चाचे नेते हर्ष तिवारी यांनी मंगळवारी जबलपूरमधील पानगर पोलीस ठाण्यात धार्मिक भावना भडकावल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. यानंतर चित्रपट निर्माती लीना मनिमेकलाई यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्ष तिवारी हा भाजप आमदार इंदू तिवारी यांचा मुलगा आहे. त्याचवेळी राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही भोपाळमध्ये चित्रपट निर्मात्याविरोधात एफआयआर नोंदवल्याची चर्चा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com