अज्ञात युवकाकडून कमल हसनच्या कारवर हल्ला

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 15 मार्च 2021

तामिळनाडू मधील मक्कल निधी नियम (एम एन एन) चे प्रमुख आणि अभिनेते कमल यांच्या कार वर हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला एका अज्ञात यवकाकडून करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

तामिळनाडू : तामिळनाडू मधील मक्कल निधी नियम (एम एन एन) चे प्रमुख आणि अभिनेते कमल यांच्या कार वर हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला एका अज्ञात युवकाकडून करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. प्रचारानंतर कमल हसन  हॉटेल मध्ये जाण्या करीता निघाले असताना हि घटना घडली. त्याच्या कार वर हल्ला करणारा युवक हा कमल हसन चा चाहता आहे असेही म्हटले जात आहे. 

व्हिडिओ व्हायरल: मंदिरात पाणी पिण्यासाठी गेला होता मुलगा; पण आडवा आला धर्म 

या घटनेदरम्यान कमल हसन यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही ते सुरक्षित आहे. मात्र त्यांच्या वाहनाचे थोडे नुकसान झाले आहे. असे पक्षातील एका नेत्याने सांगितले. एमएनएन चे नेते ए.जी. मौर्य यांनी ट्विट करून या घटनेबद्दलची माहिती दिली आहे. 

इंडिगो विमानने प्रवासादरम्यान केली नागपुरात आपत्कालीन लँडिंग; तरीही दुर्घटना टळली नाही 

हल्ला करणाऱ्या युवकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपी युवक हा मद्यधुंध अवस्थेत होता. या घटनेनंत त्याला एमएनएनच्या काही कार्यकर्त्यांनी आणि तेथील सामान्य नागरिकांनी मारहाण केली. या सर्व घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला रुग्णालयात दाखल केले, अशी माहीती एमएनएन चे नेते ए.जी. मौर्य  यांनी दिली.

संबंधित बातम्या