कमलनाथ यांना आयोगाचा दणका

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

महिला नेत्यांविरोधातील वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत आलेले मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना निवडणूक आयोगाने आचारसंहिता भंगाचे कारण देत काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळले आहे.

नवी दिल्ली : महिला नेत्यांविरोधातील वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत आलेले मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना निवडणूक आयोगाने आचारसंहिता भंगाचे कारण देत काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळले आहे. यानंतरही त्यांना प्रचारासाठी बोलावल्यास सभेचा खर्च पक्षाऐवजी उमेदवाराच्या खर्चात दर्शविला जाईल, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. 3 नोव्हेंबरला राज्यातील 28 जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. 

कमलनाथ हे मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही आहेत. त्यामुळे, राज्यात विधानसभेच्या 28 जागांसाठी सुरू असलेल्या पोटनिवडणुकीच्या ऐन रणधुमाळीमध्ये त्यांच्यावरील या कारवाईमुळे काँग्रेसची कोंडी झाली आहे.

संबंधित बातम्या