कंगना आणि अर्णब देशभक्त ; शेतकरी देशद्रोही? संजय राऊतांचं टिकास्त्र

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी शेतकरी आंदोलनावरुन मोदी सरकारला घेऱण्यास सुरुवात केली आहे.

नवी दिल्ली: गेल्या तीन महिन्यांपासून शेतकरी कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करत आहे. कृषी कायद्यावरुन शेतकरी नेते आणि केंद्र सरकारमध्ये अनेक चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या मात्र योग्य तो तोडगा निघू शकला नाही. सध्या देशात कृषी कायद्यावरुन राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी शेतकरी आंदोलनावरुन मोदी सरकारला घेऱण्यास सुरुवात केली आहे. राज्यसभेत कृषी कायद्यासंबंधी शेतकऱ्यांचे आंदोलन हातळण्यावरुन जोरदार हल्लाबोल केला जात आहे.

शिवसेना खासदार संजय राऊतांनी केंद्र सरकारवर कृषी कायद्यांच्या हाताळण्यावरुन हल्लाबोल केला. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला केंद्र सरकार बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि हे देशासाठी कदापि योग्य नाही. राष्ट्रध्वजाचा अपमान झाला या कारणामुळे मोदींप्रमाणे संपूर्ण देश खेद व्यक्त करत आहे. दरम्यान दिप सिध्दूला अद्याप अटक का करण्यात आली नाही अशी विचारणा देखील राऊतांनी केली आहे. प्रजासत्ताक दिनी निघालेल्या ट्रक्टर रॅली दरम्यान दिल्लीत हिंसाचार माजला याच वेळी लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा लावण्यात आला होता. प्रक्षोभक भाषण करणारा दिप सिध्दूसंह सहाजण फरार आहेत.  

 Farmer protest: गाझीपूर सीमेवर आंदोलक शेतकरी आक्रमक

राज्यसभेच्या अध्यक्षांच्या अभिभाषणाच्या दरम्यान चर्चा करताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत पुढे म्हणाले, आमच्या देशातले देशभक्त कोण आहेत, अर्णब गोस्वामी ज्यामुळे महाराष्ट्रात एका निष्पाप व्यक्तीने आत्महत्या केली. कंगना रणावत ती देशभक्त आहे. आणि आपल्या हक्कासाठी आंदोलन करणारा शेतकरी देशद्रोही आहे. राऊत अर्णब गोस्वामी बद्दल बोलताना म्हणाले, बालाकोट हल्याची  गुप्त माहीती त्यांना माहीत होती. तो केंद्र सरकारच्या आश्रयामध्ये आहे त्याला केंद्र सरकारचे संरक्षण आहे. आपण त्याच्यावर बोलू नये. बोलणाऱ्याला देशद्रोही  घोषीत केले जाते. आणि जो सरकारला प्रश्न  विचारतो  त्यालाही  देशद्रोही म्हणुन अटक करण्यात येते.

"सेलिब्रिटींमुळे देश चालत नाही"; संजय राऊतांचा टोला

संसदीय सभागृहात संजय राऊत म्हणाले, आमचे सहकारी  सदस्य संजय सिंग त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालला आहे. सुप्रसिद्ध पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्यावरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. सिंघू सीमेवरुन शेतकरी आंदोलनाच्या बातम्या देणाऱ्या पत्रकार आणि लेखकांवर देशद्रोहाच्या खटला दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, संजय राऊत म्हणाले, कायद्याने आयपीसीचे सर्व कलम  रद्द  केले आहेत.आम्ही देशाच्या पंतप्रधानांचा सन्मान करतो आणि करत राहु . २6 जानेवारीला लाल किल्ल्यावर हिंसाचारा बद्दल बोलताना राऊत म्हणाले की दीप सिद्धू कोण आहे हे सरकार सांगत नाही. त्याला अद्याप पकडले गेले नाही. 200 पेक्षा अधिक शेतकरी तिहार तुरूंगात आहेत आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा  खटला  सुरू आहे. 100 हून अधिक तरुण बेपत्ता आहेत.

 

संबंधित बातम्या