कंगना रणौतने घेतली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट, 'म्हणाली...'

बॉलिवूड अभिनेत्री आणि उत्तर प्रदेश राज्याच्या वन डिस्ट्रिक्ट वन प्रोजेक्ट (ODOP) योजनेची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर कंगना रणौतने रविवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली.
कंगना रणौतने घेतली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट, 'म्हणाली...'
Kangana Ranaut Meets Yogi AdityanathDainik Gomantak

बॉलिवूड अभिनेत्री आणि उत्तर प्रदेश राज्याच्या वन डिस्ट्रिक्ट वन प्रोजेक्ट (ODOP) योजनेची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर कंगना रणौतने रविवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. यादरम्यान सीएम योगींनी (Yogi Adityanath) तिला वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाशी संबंधित एक गिफ्ट हॅम्पर दिले. यावेळी अभिनेत्री कंगना राणौतने (Kangana Ranaut) मुख्यमंत्री योगींना पुष्पगुच्छ दिला. भेटीनंतर कंगनाने सीएम योगी यांच्या भेटीचा फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. (Kangana Ranaut called on Yogi Adityanath Chief Minister of Uttar Pradesh)

मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर कंगना रणौतने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर केला. कॅप्शनमध्ये तिने लिहिले- 'नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जबरदस्त विजयानंतर आज मला महाराज योगी आदित्यनाथजींना भेटण्याची संधी मिळाली. ती एक अद्भुत संध्याकाळ होती. महाराज आदित्यनाथजींची करुणा मला नेहमीच आश्चर्यचकित करते.'

Kangana Ranaut Meets Yogi Adityanath
कंगना रणौतच्या 'धाकड' वर अमेरिकन लेखक क्रिस गोरने केली खास कमेंट

'धाकड'चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला

कंगना राणौतच्या ‘धाकड’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. कंगना प्रत्येक वेळी तिच्या चित्रपटात काहीतरी वेगळे आणि नवीन करते. यावेळीही कंगनाच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून सर्वांचेच डोळ दिपले आहेत. कंगना धाकडच्या ट्रेलरमध्ये एका रफ अँड टफ स्त्रीच्या भूमिकेत जोरदार फायटिंग सीन करताना दिसत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कंगना राणौतसोबत अर्जुन रामपाल देखील दिसत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.