'महात्मा गांधी तर सत्तेचे भुकेले', कंगना पुन्हा बरळली

आपल्या दुसऱ्या पोस्ट मध्ये कंगनाने इतिहास सांगत गांधींनाच भगतसिंगांना फाशी द्यायची होती असे म्हणत
'महात्मा गांधी तर सत्तेचे भुकेले', कंगना पुन्हा बरळली
Kangana Ranaut statement on Mahatma GandhiDainik Gomantak

अभिनेत्री कंगना राणौतने (Kangana Ranaut) पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करत खळबळ उडवली आहे. यावेळी कंगनाने राष्ट्रपिता महात्मा गांधींवर (Mahatma Gandhi) निशाणा साधला आहे. कंगनाने सोशल साईट इंस्टाग्रामवर दोन मॅसेज पोस्ट केले आहेत. (Kangana Ranaut statement on Mahatma Gandhi)

त्यातल्या पहिल्या मॅसेज मध्ये कंगनाने एका जुन्या पेपरचे कटिंग पोस्ट करत लिहिले की," तुम्ही एकतर गांधींचे चाहते असू शकता किंवा नेताजींचे समर्थक असू शकता. तुम्ही दोघे असू शकत नाही. निवडा आणि ठरवा.”कंगनाने इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये लिहिलेल्या संदेशात चक्क बापूंना सत्तेची भूक होती आणि ते धूर्त होते असे वर्णन करण्याचे धाडस केले. याआधी कंगनाने भारताला मिळालेले स्वतंत्र ही भीक असल्याचे म्हटले होते.

कंगनाने “ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्यांना त्या लोकांनी त्यांच्या मालकांच्या स्वाधीन केले , ज्यांच्यावर अत्याचार करणार्‍यांशी लढण्याची हिम्मत किंवा तसे रक्त नव्हते. हे सत्तेचे भुकेले आणि धूर्त लोक होते. त्यांनीच आम्हाला शिकवले की जर कोणी तुमच्या एका गालावर चापट मारली तर दुसरा गाल त्याच्यासमोर फिरवा म्हणजे तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल. याला स्वातंत्र्य नाही तर केवळ भीक मागणे म्हणतात . तुमचा नायक हुशारीने निवडा." अशी वादग्रस्त टीका केली आहे.

Kangana Ranaut statement on Mahatma Gandhi
'रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा' मानत केंद्रीय मंत्र्यांनी वाचवले प्रवाशाचे प्राण

तर आपल्या दुसऱ्या पोस्ट मध्ये कंगनाने इतिहास सांगत गांधींनाच भगतसिंगांना फाशी द्यायची होती असे म्हणत "गांधींनी कधीही भगतसिंग आणि नेताजींना पाठिंबा दिला नाही. भगतसिंगांना फाशी द्यावी अशी गांधीजींची इच्छा होती असे अनेक पुरावे आहेत. म्हणूनच तुम्ही कोणाचे समर्थन करता ते तुम्ही निवडले पाहिजे, कारण त्यांना तुमच्या आठवणींमध्ये एकत्र ठेवणे आणि दरवर्षी त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करणे पुरेसे नाही. खरे सांगायचे तर हा केवळ मूर्खपणा नाही तर अतिशय बेजबाबदार आणि वरवरचा आहे. लोकांना त्यांचा इतिहास आणि त्यांचे नायक माहित असले पाहिजेत." कंगनाने पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com