Kanjhawala Incident: कांजवाला बलात्कार प्रकरणी गृह मंत्रालय अ‍ॅक्शन मोडमध्ये, महिला अधिकारी करणार तपास

Kanjhawala Incident: दिल्लीतील कांजवाला येथील मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी गृह मंत्रालयही अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे.
Amit Shah
Amit ShahDainik Gomantak

Kanjhawala Incident: दिल्लीतील कांजवाला येथील मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी गृह मंत्रालयही अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. वैद्यकीय अहवालाच्या आधारे कांजवाला मृत्यू प्रकरणाचा पुढील तपास केला जाईल, असे पोलिसांनी सोमवारी सांगितले. दरम्यान, स्वतः गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेत एका महिला अधिकाऱ्याला तपास पुढे नेण्याचे आदेश दिले आहेत. गृह मंत्रालयाने विशेष सीपी शालिनी सिंह यांना तपासाचे नेतृत्व करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर यासंबंधीचा रिपोर्ट तात्काळ गृह मंत्रालयाकडे सोपवण्यासही सांगितले आहे.

तत्पूर्वी, डॉ. सागर पी हुडा, विशेष सीपी (एल अँड ओ) झोन II यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले की, या प्रकरणाच्या तपासासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत. या प्रकरणात, एका 20 वर्षीय मुलीला कथितपणे कारने धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला. दुसरीकडे, या प्रकरणावर बोलताना दिल्लीचे पोलीस (Police) आयुक्त संजय अरोरा म्हणाले की, 'अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कठोर कारवाई करुन एक आदर्श ठेवू.'

Amit Shah
Jammu And Kashmir: दोन दिवसांत 6 हिंदूंची हत्या, लहान मुलांनाही दहशतवाद्यांकडून केलं जातयं लक्ष्य

काय आहे कांजवाला प्रकरण?

पोलिसांनी सांगितले की, 1 जानेवारी (रविवार) पहाटे स्कूटीवरुन जात असलेल्या 20 वर्षीय मुलीला कारने धडक दिली. मारुती बलेनोमध्ये पाच जण होते, ज्यांनी स्कूटीवरुन जाणाऱ्या मुलीला धडक दिली. या मुलीचा कथित व्हिडिओही सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.

Amit Shah
Jammu And Kashmir: शोपियानमध्ये दहशतवाद्यांकडून CRPF जवानाची हत्या

शिवाय, पीडितेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा दावाही फुटेजमध्ये करण्यात आला आहे. मात्र पोलिसांनी हा अपघात असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी दिल्ली महिला आयोगाने (DCW) पोलिसांना नोटीसही बजावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांजवाला पोलिस स्टेशन (रोहिणी जिल्हा) येथे पहाटे 3.24 वाजता कुतुबगढ भागाकडे जाणाऱ्या कारला एक मृतदेह बांधलेला असल्याची माहिती मिळाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com