कपिल देव यांची प्रकृती स्थिर

वृत्तसंस्था
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

माजी विश्‍वकरंडक विजेते कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यातआली. त्यांना काही दिवसांत डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे रुग्णालयाने सांगितले आहे.

नवी दिल्ली: माजी विश्‍वकरंडक विजेते कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यातआली. त्यांना काही दिवसांत डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे रुग्णालयाने सांगितले आहे.क्रिकेट जगतातील सर्वोत्तम
अष्टपैलूत कपिलदेव यांची गणना होते. त्यांना मध्यरात्री अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने ओखला रोड येथील फोर्टिस एस्कॉर्टस् हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले आहे. ‘‘६२ वर्षीय कपिलदेव पहाटे एक वाजता रुग्णालयात आणण्यात आले. त्यावेळी ते छातीत दुखत असल्याची तक्रार करीत होते. त्यांच्यावर तातडीने अँजिओप्लास्टी करण्यात आली. सध्या ते अतिदक्षता विभागात आहेत. त्यांना काही दिवसांत डिस्चार्ज देण्यात येईल,’’ असे रुग्णालयाने सांगितले. कपिलदेव यांची प्रकृती आता ठीक आहे. मी नुकताच त्यांची पत्नी रोमा यांच्याशी बोललो आहे. रुग्णालयात त्यांचे चेकअप सुरू आहे, असे भारतीय क्रिकेटपटू संघटनेचे अध्यक्ष अशोक मल्होत्रा यांनी सांगितले. कपिलदेव यांच्यावरील उपचारांना यश आले आहे. ते लवकरच घरी परततील, असे ट्‌विट कपिलदेव यांचे सहकारी मदनलाल यांनी केले आहे.

नटराज शॉटसाठी प्रसिद्ध असलेल्या कपिल यांना रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी समाज माध्यमांवर वेगाने पसरली. अनेक क्रीडापटू तसेच क्रीडा रसिकांना त्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थनाकेली. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने
प्रथम १९८३ मध्ये विश्वकरंडक जिंकला होता. ही स्पर्धा जिंकताना भारताने पहिल्या दोन स्पर्धेतील विजेत्या वेस्ट इंडीजला हॅट्ट्रिकपासून रोखले होते. त्यांनी आंतरराष्रीट्य क्रिकेटमध्ये नऊ हजार धावा केल्या, तसेच ३८७ विकेट घेतल्या. ते १३१ कसोटी आणि
२२५ एकदिवसीय लढती खेळले आहेत.

संबंधित बातम्या