कर्नाटकात पती-पत्नीच्या वादात 6 जणांचा मृत्यू

दैनिक गोमंतक
रविवार, 4 एप्रिल 2021

कर्नाटकच्या कोडागु जिल्ह्यातील पोन्नापेट गावाजवळ मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका मजुराने आपल्या नातेवाईकाच्या घरात आग लावल्याची घटना शनिवारी घडली.

कर्नाटकच्या कोडागु जिल्ह्यातील पोन्नापेट गावाजवळ मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका मजुराने आपल्या नातेवाईकाच्या घरात आग लावल्याची घटना शनिवारी घडली. या घटनेत चार लहान मुलांसह सहा जणांचा मृत्यू झाला असून, भाजल्यामुळे चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर मदिकेरी आणि म्हैसूर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते आहे. तर ही घटना घडल्यापासून आरोपी येरवारा बोजा हा फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.(In Karnataka 6 people killed in marital dispute)

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार येरवारा बोजा आणि त्याच्या पत्नीचे बऱ्याच दिवसांपासून वाद होत होते, याच वादाला कंटाळून एका आठवड्यापूर्वी बोजाची पत्नी गावातच राहत असलेल्या आपल्या भावाच्या घरी गेली होती. त्यातच शनिवारी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या येरवारा बोजा याने पत्नी राहत असलेल्या साल्याचे घर गाठले. मध्यरात्री घराचा दरवाजा वाजवायला सुरुवात केली. मात्र कुणीही दार न उघडल्याने त्याने थेट घराच्या छतावर जाऊन पेट्रोल टाकले आणि आग लावली. या घटनेत संपूर्ण घर जळून खाक झाले. यावेळी घरात उपस्थित असलेल्या कुटुंबातील लहान मुलांसह 6 जणांनी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीचे स्वरूप मोठे असल्याने त्यांना आपला जीव वाचवता आला नाही.

कोरोनाचा कहर: मृतदेहांचा अत्यंसस्कार करायला मिळेना जागा

या घटनेमुळे पन्नापेट आणि आजूबाजूच्या परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे. या घटनेतील मुख्य आरोपी येरवारा बोजा हा घटना घडल्यानंतर लगेचच घटना स्थळावरून पळून गेला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच लवकरच त्याचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकण्यात येतील असेही पोलिसांनी सांगितले.  

संबंधित बातम्या