Karnatakal CM Race: डी. के. शिवकुमार की सिद्धरामय्या? कुणाचे पारडे जड? जाणून घ्या पॉईंट्समध्ये...

आमदारांचे पाठबळ कुणाला मिळणार?
 D. K. Shivakumar | Siddaramaiah
D. K. Shivakumar | SiddaramaiahDainik Gomanak

Karnataka CM Race: कर्नाटकात काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्री पदासाठी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) या दोन्ही प्रबळ दावेदारांमध्ये रस्सीखचे सुरू झाली आहे.

या दोन्ही नेत्यांची ताकद, कमकुवतपणा, त्यांच्याकडे असणारी संधी आणि त्यांच्यासमोर असेलली जोखीम याविषयी जाणून घेऊया. त्यातून कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची ही रेस कोण जिंकेल ते स्पष्ट होऊ शकते. (Karnataka Election Result 2023)

 D. K. Shivakumar | Siddaramaiah
गोव्यात 'आप'च्या प्रचारासाठी दिले 17 कोटी रूपये; आता अडकला सीबीआयच्या जाळ्यात

सिद्धरामय्या यांचे प्लस पॉईंट

  1. राज्यव्यापी प्रभाव

  2. काँग्रेस आमदारांमध्ये लोकप्रिय

  3. मुख्यमंत्री म्हणून सरकार चालवण्याचा अनुभव (2013-18 या काळात मुख्यमंत्री).

  4. एकूण 13 बजेट तयार करण्याचा अनुभव असलेले सक्षम प्रशासक

  5. कन्नडमध्ये अहिंदा म्हणजे अल्पसंख्याक, मागास आणि दलित या गटांवर पकड असलेले नेते

  6. भाजप आणि जनता दल सेक्युलर यांना कोंडीत पकडण्याची क्षमता.

  7. सिद्धरामय्या हे राहुल गांधींच्या जवळचे मानले जातात.

  8. सिद्धरामय्या यांची ही शेवटची निवडणूक आणि मुख्यमंत्री होण्याची शेवटची संधी.

  9. निर्णायक जनादेशाने सरकार चालवण्यासाठी आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला बळकट करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा स्वीकारार्हता, आवाहन आणि अनुभव त्यांच्याकडे आहे.

सिद्धरामय्या यांचे मायनस पॉईंट

  1. पक्षाच्या संघटनेशी संपर्क कमी

  2. 2018 मध्ये काँग्रेस सरकारला पुन्हा सत्तेत आणण्यात अपयश

  3. सिद्धरामय्या पुर्वी जनता दल सेक्युलर पक्षात होते. काँग्रेसच्या जुन्या नेत्यांचा एक गट अजूनही त्यांना बाहेरचा माणूस मानतो

  4. सिद्धरामय्या सध्या 75 वर्षांचे आहेत. हा मुद्दा त्यांच्या विरोधात जाऊ शकतो

  5. मल्लिकार्जुन खर्गे, जी. परमेश्वर यांचे मुख्यमंत्रीपद सिद्धरामय्यांमुळे हुकले. बी. के. हरिप्रसाद, के. एच. मुनियप्पा हेही त्यांचे विरोधक मानले जातात

  6. दलित किंवा लिंगायत मुख्यमंत्री करण्याची मागणी

 D. K. Shivakumar | Siddaramaiah
पैशाविना बापाची दैना, रुग्णवाहिकेसाठी नव्हते पैसे; बसमधूनच नेला 5 महिन्याच्या चिमुकलीचा मृतदेह

शिवकुमार यांचे प्लस पॉईंट

  1. मजबूत संघटनात्मक क्षमता आणि पक्षाला निवडणुकीत विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका

  2. काँग्रेस पक्षाचे निष्ठावान अशी 61 वर्षीय शिवकुमार यांची ओळख आहे

  3. काँग्रेसचे संकटमोचक अशी प्रतिमा

  4. श्रीमंत नेते

  5. कर्नाटकातील वोक्कलिग समुदायाचे पाठबळ. वोक्कलिग संत, नेत्यांचा पाठिंबा शिवकुमार यांना आहे

  6. गांधी घराण्याशी जवळीक

  7. दीर्घ राजकीय अनुभव. त्यांनी विविध खातीही सांभाळली आहेत

  8. यापुर्वी कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या एस. एम. कृष्णा आणि वीरेंद्र पाटील हे मुख्यमंत्री झाले होते

  9. पक्षातील जुन्या नेत्यांची साथ मिळण्याची शक्यता आहे

शिवकुमार यांचे मायनस पॉईंट

  1. त्यांच्याविरुद्ध आयटी, ईडी आणि सीबीआयमध्ये खटले सुरू आहेत

  2. तिहार तुरुंगात शिक्षा झाली होती

  3. सिद्धरामय्या यांच्या तुलनेत शिवकुमार यांच्याकडे मास अपील आणि अनुभव कमी

  4. जुन्या म्हैसूर क्षेत्रापुरता मर्यादित प्रभाव

  5. इतर समाजाकडून फारसा पाठिंबा नाही

  6. दलित किंवा लिंगायत मुख्यमंत्री करण्याची मागणी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com