PM Modi Roadshow Video: पंतप्रधान मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर, जोरदार स्वागत अन् पृष्पवृष्टी, पाहा व्हिडिओ

पंतप्रधान मोदी आज बेंगळुरू-म्हैसूर एक्सप्रेस वे चे उद्घाटन करणार आहे
PM Modi Roadshow Video
PM Modi Roadshow VideoDainik Gomantak

PM Modi Roadshow Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर आहेत. कर्नाटक येथे 16,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी मंड्यामध्ये सुमारे 2 किलोमीटरचा रोड शो केला. रोड शो दरम्यान हजारो लोक उपस्थित होते. लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यावर पुष्पवृष्टी केली जात आहे. पंतप्रधान मोदींनीही गाडीतून उतरून लोकांना अभिवादन केले. 

मे महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका होणार असल्याने मंड्यातील पंतप्रधानांची उपस्थिती राजकीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाची आहे. मांड्या जिल्हा जुन्या म्हैसूर प्रदेशाचा एक प्रमुख भाग आहे आणि पारंपारिकपणे जनता दल सेक्युलर चा बालेकिल्ला आहे. 

जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ आहेत आणि एक वगळता सर्व जेडीच्या ताब्यात आहेत. 2019 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत एक जागा जिंकून भाजपा मंड्या जिल्ह्यात प्रवेश करू शकला.

  • पंतप्रधानांचा पुढील कार्यक्रम

पंतप्रधान मोदी मंड्या आणि हुबळी-धारवाडमध्ये 16,000 कोटी रुपयांच्या मोठ्या प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. तसंच एक्स्प्रेस वेचे उद्घाटन करणार आहेत. म्हैसूर-कुशालनगर दरम्यानच्या चौपदरी महामार्गाची पायाभरणीही पंतप्रधान मोदी करणार आहेत. 92 किलोमीटर लांबीचा हा रस्ता प्रकल्प सुमारे 4,130 कोटी रुपये खर्चून विकसित केला जाणार आहे.

  • आयआयटी धारवाडचे उद्घाटन

पंतप्रधान कार्यालयाच्या एका निवेदनात असे म्हटले आहे की, कुशलनगर आणि बंगळुरूशी कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यात हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावेल आणि त्यांच्यामधील प्रवासाचा वेळ पाच तासांवरून केवळ अडीच तासांपर्यंत कमी करण्यात मदत करेल. पंतप्रधान हुबळी-धारवाडमधील IIT धारवाड राष्ट्राला समर्पित करतील. फेब्रुवारी 2019 मध्ये त्यांनी त्याची पायाभरणी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com