Karnataka Election Result 2023: कर्नाटकात कॉंग्रेसला सत्ता, भाजपला दणका; वैदिक ज्योतिषाचं भाकित ठरलं खरं!

Karnataka Election: त्यांनी 2022 च्या विधानसभा निवडणुका आणि रशिया-युक्रेन युद्धासह अनेक मोठ्या घटनांच्या परिणामांचा अचूक अंदाज वर्तवला होता.
Basavaraj Bommai & Mallikarjun Kharge & Rahul Gandhi
Basavaraj Bommai & Mallikarjun Kharge & Rahul GandhiDainik Gomantak

Karnataka Election Result 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 224 जागांसाठी मतमोजणी सुरु असून मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाने बहुमताचा टप्पा ओलांडला.

काँग्रेसच्या उदयानंतर कोणत्या मुद्दयांनी चमत्कार घडवला आणि कोणते मुद्दे फसले याची चर्चा सुरु झाली आहे. 10 मे रोजी कर्नाटकात 224 जागांसाठी मतदान झाले होते. यामध्ये तब्बल 73.19 टक्के मतदारांनी मतदान केले होते.

दरम्यान, रुद्र करण प्रताप नावाच्या ज्योतिषाचं भाकित चर्चेत आलं आहे. त्यांनी 2022 च्या विधानसभा निवडणुका आणि रशिया-युक्रेन युद्धासह अनेक मोठ्या घटनांच्या परिणामांचा अचूक अंदाज वर्तवला होता.

आता त्यांचे अलीकडील ट्विट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, सोशल मीडियावर त्याला मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळत आहेत.

कर्नाटक (Karnataka) विधानसभा निवडणुकीबाबत त्यांनी केलेल्या भाकिताकडे लक्ष वेधले जात आहे, कारण काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल, असा दावा त्यांनी केला होता.

Basavaraj Bommai & Mallikarjun Kharge & Rahul Gandhi
Karnataka Election Result 2023: 'आय अ‍ॅम अनस्टॉपेबल'... म्हणत काँग्रेसने शेअर केला राहुल गांधींचा व्हिडिओ

दुसरीकडे, मार्चमध्ये त्यांनी ट्विट केले होते की, “मे महिना भाजपसाठी फारसा अनुकूल नाही. कर्नाटकात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल आणि भाजपपेक्षा (BJP) सरकार स्थापनेची शक्यता जास्त आहे.

बसवराज बोम्मई यांच्या तुलनेत डीके शिवकुमार यांची लोकप्रियता वाढत आहे. मला कर्नाटकातील एका विश्वसनीय सूत्राकडून याबाबत माहिती मिळाली आहे.''

Basavaraj Bommai & Mallikarjun Kharge & Rahul Gandhi
Karnataka Election Result 2023 : कर्नाटकात भाजपाचे 'बजरंगी' फेल, काँग्रेसची 'जय'; मोदींचा रोड शो तारु शकला नाही

तसेच, उपलब्ध आकडेवारीनुसार, काँग्रेस पक्ष 224 पैकी 137 जागांसह आघाडीवर आहे, तर भाजपला 62 जागा मिळाल्या आहेत.

प्रताप यांच्या या भाकिताविषयी सोशल मीडियावर व्यापक उत्सुकता आणि चर्चा रंगली आहे. त्यांच्या अचूकतेमुळे बरेच लोक आश्चर्यचकित झाले आहेत. भविष्यातील घटनांबद्दल त्यांच्या भविष्यवाणीची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com