कर्नाटक मंत्रिमंडळाचा लवकरच होणार विस्तार

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020

कर्नाटकात मंत्रिमंडळ विस्तार पूर्ण करण्यासाठी भाजप हायकमांडकडून रीतसर अनुमती मिळण्याची प्रतीक्षा असल्याचे सांगून कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराचे  संकेत दिले.

बंगळूर: कर्नाटकात मंत्रिमंडळ विस्तार पूर्ण करण्यासाठी भाजप हायकमांडकडून रीतसर अनुमती मिळण्याची प्रतीक्षा असल्याचे सांगून कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराचे  संकेत दिले. पत्रकारांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना म्हैसूरमध्ये त्यांनी ही माहिती दिली.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीमुळे मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला. येडियुराप्पा यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत किंवा पुनर्रचनेबाबत चर्चा करण्यासाठी गेल्या आठवड्यात नवी दिल्ली येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली होती, परंतु केंद्रीय नेतृत्वाने त्यांना प्रतीक्षा करण्यास सांगितले होते.

संबंधित बातम्या