
Karnataka Minister Criminal Record: कर्नाटकात काँग्रेसच्या दणदणीत विजयानंतर शनिवारी झालेल्या शपथविधी सोहळ्यात सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सिद्धरामय्या यांच्यासोबत 8 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.
यावेळी विविध समाजातील आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये केएच मुनियप्पा, जी परमेश्वरा, प्रियांक खर्गे, केजे जॉर्ज, एमबी पाटील, रामलिंगा रेड्डी, सतीश जारकीहोळी आणि बीझेड जमीर अहमद खान यांचा समावेश आहे.
दरम्यान, या 8 मंत्र्यांचा गुन्हेगारी रेकॉर्ड पाहता जमीर अहमद खान यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. जाणून घ्या, कर्नाटक सरकारमधील मंत्र्यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड...
जमीर अहमद खान: खान यांच्यावर हत्येचा आरोप, महिलेचा विनयभंग यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. कर्नाटकातील (Karnataka) चामराजपेट विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले जमीर अहमद खान 72 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत.
बळाचा वापर करुन महिलेचा विनयभंग आणि फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याशिवाय, धमकावणे, फसवणूक करण्यास प्रवृत्त करणे, सार्वजनिक ठिकाणी बेदरकारपणे वाहन चालवणे अशा गुन्ह्यांमध्येही जमीर यांना आरोपी करण्यात आले आहे.
जी परमेश्वरा: कर्नाटकातील कोरटागेरे विधानसभा जागा जिंकलेल्या परमेश्वरा यांच्यावर दंगल, सुरक्षा धोक्यात आणणे आणि सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरोप आहेत.
जी परमेश्वरा हे 8 वर्षांपासून कर्नाटक प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळेच त्यांना कर्नाटकचे उपमुख्यमंत्री करण्याची मागणीही होत होती, मात्र तसे होऊ शकले नाही. परमेश्वरा 21 कोटींहून अधिक मालमत्तेचे मालक आहेत.
प्रियांक खर्गे: कर्नाटकातील चित्तापूर मतदारसंघातून विजयी झालेल्या प्रियांक खर्गे यांच्यावर अनेक प्रकरणांमध्ये आरोप आहेत. यात मानहानी, दंगल, सार्वजनिक उपद्रव, सुरक्षा धोक्यात आणणे यासारख्या प्रकरणांचा समावेश आहे.
एडीआरच्या अहवालानुसार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक यांच्याकडे 16 कोटींहून अधिक संपत्ती आहे.
सतीश जारकीहोळी: कर्नाटकच्या यमकनमर्डी विधानसभेचे आमदार सतीश जारकीहोळी हे 175 कोटींच्या मालमत्तेचे मालक आहेत. बेकायदेशीरपणे जमावाला एकत्रित करणे या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामलिंगा रेड्डी: कर्नाटकातील बीटीएम लेआउट मतदारसंघातून विजयी झालेले आमदार रामलिंगा रेड्डी 110 कोटींच्या मालमत्तेचे मालक आहेत.
सरकारी आदेशांचे पालन न करणे आणि दंगल या प्रकरणात त्यांना आरोपी करण्यात आले आहे.
केएच मुनिअप्पा: कर्नाटक देवनहल्ली विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले माजी केंद्रीय मंत्री केएच मुनिअप्पा यांच्यावर धमकी देणे, शांतता भंग केल्याचा आरोप आहे.
मुनियप्पा हे 59 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत. मुनियप्पा यांना निवडणुकीत 73,058 मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी जेडी(एस) आमदार एलएन नारायण स्वामी यांना 68,427 मते मिळाली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.