Karnataka: बीएस येडियुरप्पा यांच्या विरोधात FIR नोंदवण्याचे आदेश

BS Yeddyurappa: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बीएस येडियुरप्पा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
BS Yeddyurappa
BS YeddyurappaDainik Gomantak

BS Yeddyurappa: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बीएस येडियुरप्पा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अतिरिक्त सत्र न्यायालयाने बुधवारी बीएस येडियुरप्पा आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या एका खाजगी तक्रारीत गुन्हा नोंदवण्याचे आणि तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, कर्नाटक उच्च न्यायालयाने (Karnataka High Court) विशेष न्यायालयाला 7 सप्टेंबर रोजी भ्रष्टाचाराच्या तक्रारीवर नव्याने सुनावणी करण्याचे निर्देश दिल्यानंतर अवघ्या एका आठवड्यानंतर न्यायालयाचा हा आदेश आला आहे. या प्रकरणातील ट्रायल कोर्टाने 8 जुलै रोजी तक्रार फेटाळली होती, कारण राज्यपालांनी तक्रारदार टीजे अब्राहम यांना मंजुरी देण्यास नकार दिला होता.

BS Yeddyurappa
Karnataka Hijab Ban: शीख धर्माच्या तुलनेवर SC ने केला 'फाइव्ह के'चा उल्लेख

काय आहे प्रकरण?

बंगळुरु विकास प्राधिकरणाला (बीडीए) कंत्राट देण्याच्या बदल्यात त्यांनी लाच घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. आरोपांना उत्तर देताना युडियुरप्पा म्हणाले की, 'माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.'

BS Yeddyurappa
Karnataka Minister Demise: कर्नाटकचे मंत्री उमेश कट्टी यांच्या निधनावर, मोदींनी व्यक्त केले शोक

माजी मुख्यमंत्री म्हणाले - आरोपात तथ्य नाही

येडियुरप्पा पुढे म्हणाले, 'या आरोपात तथ्य नाही. या प्रकरणात मी निर्दोष आहे. कुणाच्या तक्रारीमुळे मला काही फरक पडत नाही.' त्यांच्याविरुद्ध काही षडयंत्र रचले जात आहे का, असे विचारले असता त्यांनी हो असे म्हटले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com