कर्नाटकात फटाक्‍यांवर बंदी

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

कर्नाटकात कोरोना महामारीचा संसर्ग होत असल्याने दिवाळी सणात फटाक्‍यांवर बंदी घालण्यात आल्‍याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी सांगितले. बंगळूरमध्ये बोलताना ते म्हणाले, ‘दिवाळी सणाच्या वेळी फटाक्‍यांची विक्री न करण्याचा आणि फटाक्‍यांची आतषबाजी न करण्याचा निर्णय घेतला आहे.

बंगळूर, ता. ६ : कर्नाटकात कोरोना महामारीचा संसर्ग होत असल्याने दिवाळी सणात फटाक्‍यांवर बंदी घालण्यात आल्‍याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी सांगितले. बंगळूरमध्ये बोलताना ते म्हणाले, ‘दिवाळी सणाच्या वेळी फटाक्‍यांची विक्री न करण्याचा आणि फटाक्‍यांची आतषबाजी न करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंबंधी सरकार लवकरच परिपत्रक काढेल.’ फटाक्‍यांवरील बंदीच्या राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध केला जात आहे. सरकारच्या या निर्णयाचे पर्यावरणवाद्यांनी स्वागत केले आहे. पण सरकारच्या निर्णयाला सनातनवादींनी विरोध केला आहे. आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के सुधाकर यांनी, दिवाळी साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन केले. या वेळी रासायनिक फटाक्‍यांवर बंदी घालून साधी दिवाळी करावी. या वर्षी कुणीही फटाक्‍या न लावण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून फटाक्‍यांना बंदी घातली आहे. फटाके लावणाऱ्यांना रोखण्यासाठी कायद्यावर उद्या चर्चा होईल.

संबंधित बातम्या