कर्नाटक सरकारचा अजब फतवा; KSRTC बसमध्ये मोबाईलवर गाणी वाजवण्यास बंदी

कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये (Karnataka High Court) रिट याचिका दाखल केली आहे.
कर्नाटक सरकारचा अजब फतवा; KSRTC बसमध्ये मोबाईलवर गाणी वाजवण्यास बंदी
KSRTC Bus Dainik Gomantak

कर्नाटक: एस टी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी बोम्मई सरकारने नवा नियम लागू केला आहे.सरकारी बसमधून (government bus) प्रवास करत असताना आता मोबाईलवरून मोठ्या आवाजात तसेच स्पीकरवर गाणी लावता येणार नाहीत. तसेच फोनवर मोठ्याने बोलताही येणार नाही.

एस टी बस प्रवासादरम्यान मोबाईलवर (Mobile) मोठ्याने गाणी लावणे आणि बोलणे इतरांना त्रास होतोय. यासाठी त्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. कर्नाटक राज्य मार्ग परिवहन व्यवस्थापकीय महामंडळाचे संचालक शिवयोगी कळसद यांनी सरकारी बस प्रवासावेळी या नव्या नियमांचे आदेश जारी केले आहेत.

KSRTC Bus
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद संपला तरीही नेते तो का उकरून काढतात...!

कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (KSRTC) एस टी बसमध्ये प्रवास करीत असताना मोबाईलवर मोठ्याने स्पीकरवरती गाणी लावणे यावर बंदी घालण्यात आली आहे.

कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये रिट याचिका दाखल केली आहे त्या पार्श्वभूमीवर, बस कंडक्टर प्रथम प्रवाश्याना फोनचा स्पीकर बंद करण्यास सांगेल. आणि प्रवाशाने जर त्याचे पालन केले नाही तर, ड्रायव्हर किंवा कंडक्टर (Driver or conductor) त्यांना बसमधून खाली उतरण्यास सांगू शकतील. आणि ती व्यक्ती उतरेपर्यंत ड्रायव्हरला एस टी थांबवता येईल.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com