कर्नाटक सरकारचा आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

मुख्यमंत्री येडियुराप्पा मंगळवारी बेळगाव दौऱ्यावर होते. विजापूरमध्ये अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अतिवृष्टी व पिण्याच्या पाण्याची समस्या जाणून घेतली. त्यावेळी त्यांनी आलमट्टी जलाशय आणि उंची वाढविण्याच्या विषयावर भाष्य केले.

विजापूर: उत्तर कर्नाटकातील पाणलोट क्षेत्र विकास आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी आलमट्टी जलाशयाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव आहे. धरणाची उंची 524.5 मीटरपर्यंत वाढविणार असल्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी मंगळवारी (ता. 25) सांगितले. मात्र, आलमट्टीच्या बॅकवॉटरमुळे महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण होते, असा महाराष्ट्राचा दावा आहे. त्यामुळे उंची वाढविण्याच्या कर्नाटकच्या निर्णयावर महाराष्ट्रातून काय प्रतिक्रिया व्यक्‍त होते याचेच औत्स्युक्‍य आहे.

मुख्यमंत्री येडियुराप्पा मंगळवारी बेळगाव दौऱ्यावर होते. विजापूरमध्ये अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अतिवृष्टी व पिण्याच्या पाण्याची समस्या जाणून घेतली. त्यावेळी त्यांनी आलमट्टी जलाशय आणि उंची वाढविण्याच्या विषयावर भाष्य केले. आलमट्टी जलाशयाची उंची वाढविणे व नारायणपूर धरणाद्वारे पाच जिल्ह्यातील 6 लाख 22 हेक्‍टर क्षेत्राला पाणी पुरवठा होणार आहे. गुलबर्गा, यादगिरी, विजापूर, रायचूर व बागलकोट जिल्ह्यांना याचा लाभ होईल. कृष्णा जल लवादाच्या निकालामुळे तिसऱ्या टप्प्यात 130 टीएमसी पाणी वाटप करण्यासाठी आलमट्टीची उंची वाढविणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या