कर्नाटक उच्च न्यायालय न्यायाधीशांना बदलीची धमकी

मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, जमीन नांगरायला तयार आहे; पण जनतेसाठी - न्यायाधीश
karnataka Court
karnataka Court Dainik Gomantak

आपल्याला मलई खाता यावी याकरीता प्रशासकीय अधिकाऱ्याला बदलीची धमकी देत शांत करण्यासाठीचे प्रयत्न आपण बऱ्याचदा वाचले अथवा ऐकले असेल. मात्र एखाद्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना बदलीची धमकी देण्याची हिंमत केलेली आपण वाचले किंवा ऐकले नसेल पण हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. कर्नाटक उच्च न्यायालय न्यायाधीशांच्या बाबतीत. ( karnataka High court justice HP sandesh transfer threat )

karnataka Court
मोदी सरकारचा मोठा निर्णय, 60 वर्षांवरील कैद्यांची 15 ऑगस्टला होणार सुटका

मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना बदलीची धमकी मिळाली आहे. भ्रष्टाचार प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) अधिकाऱ्याला फटकारल्यानंतर उच्च न्यायालयाच्या वरिष्ठ न्यायमूर्तींनी त्यांची बदली केली जाऊ शकते, असा आरोप न्यायाधीश एचपी संदेश यांनी केला आहे. न्यायमूर्ती संदेश म्हणाले की, लोकांच्या हितासाठी त्यांची बदली झाली असली, तरी त्यासाठीही आपण तयार आहोत.

karnataka Court
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु, जाणून घ्या काय आहेत अटी

काय आहे प्रकरण ?

बेंगळुरू शहराचे शहर उपायुक्त जे मंजुनाथ यांच्या कार्यकाळात नायब तहसीलदार पीएस महेश यांना 5 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. महेशविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून त्याच्या जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर 30 जून रोजी सुनावणी झाली. यावर महेश यांनी मंजुनाथने लाच घेण्यास सांगितले होते, असे वक्तव्यात म्हटले होते, मात्र न्यायमूर्ती संदेश यांच्या खंडपीठाने म्हटले की, मंजुनाथचे नावही एफआयआरमध्ये नाही.

त्यानंतर न्यायमूर्ती संदेश यांनी या प्रकरणाची सुनावणी करताना एसीबीला भ्रष्टाचाराचे केंद्र आणि संकलन केंद्र म्हटले. न्यायमूर्तींनी असेही म्हटले होते की, एसीबी सध्या कलंकित एडीजीपी सीमांत कुमार सिंग यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. न्यायाधीशांच्या टीकेनंतर सोमवारी उपायुक्त जे मंजुनाथ यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.

जनतेच्या हितासाठी माझी बदली झाली तर मी तयार आहे

न्यायमूर्ती संदेश यांनी याबाबत बोलताना सांगितले की, मला सांगण्यात आले की लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोचे एडीजीपी एक शक्तिशाली व्यक्ती आहेत. त्यामूळे बदलीची धमकी दिली जाईल. जनतेच्या हितासाठी माझी बदली झाली तर मी त्यासाठी तयार आहे. मी कोणाला घाबरत नाही. मी न्यायाधीश झाल्यानंतर कोणतीही मालमत्ता जमा केलेली नाही. माझी हरकत नाही. मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी जमीन नांगरायला तयार आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही. मी कोणतीही राजकीय विचारधारा मानत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com