
Karnataka Home Minister Parameshwara: कर्नाटकाचे गृहमंत्री डॉ. जी परमेश्वर यांनी मंगळवारी त्यांच्या मतदारसंघ कोरटागेरे येथे शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाला संबोधित करताना हिंदू धर्मावर वादग्रस्त टिप्पणी केली.
परमेश्वर म्हणाले की, हिंदू धर्माची स्थापना कोणी केली यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. विविध धर्म आणि त्यांच्या पार्श्वभूमीबद्दल बोलताना परमेश्वर म्हणाले की, हिंदू धर्माची सुरुवात केव्हा झाली हे कोणालाही माहिती नाही.
“या जगात अनेक धर्म आहेत. हिंदू (Hindu) धर्माचा उदय कधी झाला? त्याचा उदय कुठे झाला? हा एक प्रश्न आहे. ज्याचे उत्तर अजून मिळायचे आहे. बौद्ध धर्माचा उदय याच देशात झाला, जैन धर्मही इथेच उदयास आला. इस्लाम आणि ख्रिश्चन धर्म बाहेरुन आले,'' असेही परमेश्वर म्हणाले.
दरम्यान, कर्नाटकातील (Karnataka) भाजपच्या अनेक नेत्यांनी परमेश्वर यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. भाजप नेते श्रीनिवास पुजारी म्हणाले की, हिंदू धर्मावरील परमेश्वर यांचे वक्तव्य निषेधार्ह आहे.
“राज्यात अनेक प्रश्न आहेत, त्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी मंत्रिमहोदयांनी असे घृणास्पद वक्तव्य केले आहे. हिंदू धर्माला कुठलाही आधार नाही असे म्हणणेचं अनुचित आहे. आम्हाला त्यांच्याकडून अशा वक्तव्यांची अपेक्षा नव्हती.
यावरुन काँग्रेसची मानसिकता दिसून येते. विशिष्ट समुदायाला खूश करण्यासाठी अशी विधाने केली जातात,” असेही पुजारी पुढे म्हणाले.
तसेच, कर्नाटक भाजपचे सरचिटणीस एन रवी कुमार यांनी गृहमंत्र्यांवर सडकून टीका केली. त्यांनी हिंदू समाजाची खिल्ली उडवली आहे, असे कुमार म्हणाले.
“परमेश्वर यांनी हिंदू धर्माच्या अस्तित्वावरचं प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांची ही टिप्पणी म्हणजे हिंदू धर्माची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न होता.
हिंदू धर्माची इतर कोणत्याही धर्माशी तुलना होऊ शकत नाही. हिंदू धर्म हा एक असा धर्म आहे, ज्याचा सर्व समुदाय आदर करतात,” असेही रवी कुमार पुढे म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.