Karnataka विधानसभेचे उपसभापती मामानी यांचे निधन, वयाच्या 56 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Deputy Speaker Anand Mamani: कर्नाटक विधानसभेचे उपसभापती आनंद मामानी यांचे शनिवारी रात्री एका खासगी रुग्णालयात निधन झाले.
Karnataka
KarnatakaDainik Gomantak

Karnataka Legislative Assembly Deputy Speaker Anand Mamani: भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार आणि कर्नाटक विधानसभेचे उपसभापती आनंद मामानी यांचे शनिवारी रात्री एका खासगी रुग्णालयात निधन झाले. कौटुंबिक सूत्रांनी रविवारी ही माहिती दिली. सूत्रांनी सांगितले की, मामानी काही गंभीर आजाराने त्रस्त होते. ते 56 वर्षांचे होते. सौदत्ती मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेल्या मामानी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी रुग्णालयात जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. बोम्मई यांनी ट्विट करत म्हटले की, “आमच्या पक्षाचे आमदार आणि उपसभापती आनंद चंद्रशेखर मामानी (Anand Chandrasekhar Mamani) यांच्या निधनाची बातमी कळताच खूप दुःख झाले. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि देव त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. ओम शांती.''

Karnataka
Karnataka: मशिदींसाठी नवा आदेश जारी, दोन वर्षांसाठी सरकारने केली ही व्यवस्था

दुसरीकडे, आनंद मामानी यांचे वडील चंद्रशेखर एम. मामानी हे देखील 1990 च्या दशकात उपाध्यक्ष होते. सौंदत्ती मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेले मामानी हे भाजपचे (BJP) नेते होते. त्यांचे वडील चंद्रशेकर मामानी हे चार वेळा आमदार होते. एकदा अपक्ष म्हणून तर तीनदा जनता परिवाराचे उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक (Election) जिंकली. राजन्ना मामानी या नावाने ओळखले जाणारे त्यांचे काका विश्वनाथ करबिसप्पा मामानी हे देखील 2004 मध्ये अपक्ष आमदार होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com