Karnataka Lockdown:बेळगावसह इतर जिल्ह्यात 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन

karnatak lockdaun.jpg
karnatak lockdaun.jpg

बेंगळुरू : वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने राज्यात 14 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली आहे. लॉकडाऊनच्या काळात  केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी दिली जाणार आहे. मंगळवारी रात्री 9 वाजेपासून या लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू होईल. कर्नाटकचे सीएम बी.एस येडियुरप्पा यांनी या लॉकडाउनची घोषणा केली आहे. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने सकाळी 6 ते सकाळी 10 या वेळेत खुली राहणार आहेत. विशेष म्हणजे कर्नाटकमधील लॉकडाऊन दिल्ली आणि महाराष्ट्रच्या तुलनेत थोडे कठोर असेल. (Karnataka Lockdown: 14 days of severe lockdown in Belgaum and other districts) 

त्याशिवाय बांधकाम, उत्पादन आणि शेतीविषयक कामांशी संबंधित वस्तूंची विक्री करणारी दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. लॉकडाऊन दरम्यान सार्वजनिक वाहतूक सेवाही पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले. कमी-अधिक प्रमाणात राहिलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटात कर्नाटकमध्ये प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. कर्नाटकात रविवारी 34,804 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली जी आतापर्यंतची सर्वात मोठी आकडेवारी आहे. तर 134 कोरोना बंधितांचा मृत्यू लोकांचा मृत्यू झाला आहे.  नवीन प्रकरणांची नोंद झाल्यानंतर राज्यात एकूण कोरोनाची प्रकरणे 13.49 लाखांवर गेली आहेत. तर 14,426 मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील विशेषत: बंगळुरुमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आढळून आले आहे.  दिल्लीनंतर बंगलोर या शहरात कोरोनाकहा प्रसार सर्वात वेगाने होत  असल्याचे दिसून आले आहे. राज्यात कोरोना सकारात्मकतेचे प्रमाण 20 टक्क्यांच्या जवळपास पोहोचले आहे. हे स्पष्ट आहे की संकट आणखी तीव्र झाले आहे. 

'राज्यात कोरोना संसर्ग झपाट्याने पसरत आहे. कर्नाटकात हे संकट महाराष्ट्र आणि दिल्लीपेक्षा अधिक वाढले आहे. आम्ही सरकारी रुग्णालयांमध्ये 18 वर्षांवरील सर्व लोकांना कोरोना विनामूल्य  लसीकरण करणार आहोत. तर केंद्र सरकार 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांचे मोफत लसीकरण करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री बी. एस येडियुरप्पा यांनी दिली आहे. राज्यात लॉकडाउन लावण्याबाबत आज येडियुरप्पा यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. यावेळी सर्व मंत्र्यांनी लॉकडाऊन लावण्याच्या निर्णयावर एकमत दर्शवल्यानंतर राज्यात लॉकडाऊनचा  निर्णय घेण्यात आला. याबाबत बोलताना कर्नाटकचे उद्योगमंत्री जगदीश शेट्टार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ''आम्ही लॉकडाउनच्या बाजूने नाही परंतु परिस्थिती अशी आहे की कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी आम्हाला निर्बंध लावावे लागत आहेत. आपल्याला संक्रमणाची साखळी तोंडायची आहे.  पुढील 10-12 दिवसांचा प्रश्न आहे. एकदा संसर्ग रोखण्यात यश आले की, निर्बंधही हळूहळू हटवण्यात येतील आणि परिस्थिती पूर्ववत होईल, असे मत जगदीश शेट्टार यांनी व्यक्त केले आहे.  

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com