Karnataka: नाईट कर्फ्यू आणि वीकेंड लाॅकडाऊन लागू

शनिवार आणि रविवार वीकेंड कर्फ्यू लागू करण्याची घोषणा कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Chief Minister Basavaraj Bommai) यांनी केली आहे.
Night curfew
Night curfewDainik Gomantak

देशात कोरोनाचा (Covid 19) संकट गंभीर असताना दुसरीकडे कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता कर्नाटक प्रशासनानं नाईट कर्फ्यू (Night curfew) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नाईट कर्फ्यूच्या काळामध्ये कलम 144 लागू राहणार आहे. त्याचबरोबर सीमेवरील बेळगाव, बिदर, म्हैसूर, चामराजनगर, दक्षिण कन्नड, कोडगू आणि विजापूर जिल्ह्यांमध्ये शनिवार आणि रविवार वीकेंड कर्फ्यू लागू करण्याची घोषणा कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Chief Minister Basavaraj Bommai) यांनी केली आहे.

Night curfew
Karnataka: नव्या मुखमंत्र्यांचा उद्या शपथविधी

दरम्यान राज्यातील अनेक शहरांमध्ये कोरोनामुळे परिस्थिती जास्तच बिकट होत चालली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना जिल्हा आणि महानगरपालिका प्रशासन सतर्क पुन्हा एकदा सतर्क झालं आहे. कोरोनाच्या पाश्वभूमीवर नाईट कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील ही संचारबंदी रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com