बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळींनी तरूणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप; आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 3 मार्च 2021

कर्नाटकातील सामाजिक कार्यकर्ते व नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कलहळ्ळी यांनी बेळगावचे पालकमंत्री आणि कर्नाटकाचे जलसंपदामंत्री असलेले भाजप नेते रमेश जारकीहोळी यांच्याविरूद्ध एका तरूणीवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार नोंदवत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

बंगळुरू : कर्नाटकातील सामाजिक कार्यकर्ते व नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कलहळ्ळी यांनी मंगळवारी बंगळुरू शहर पोलिस आयुक्त कमल पंत यांच्याशी संपर्क साधून बेळगावचे पालकमंत्री आणि कर्नाटकाचे जलसंपदामंत्री असलेले भाजप नेते रमेश जारकीहोळी यांच्याविरूद्ध एका तरूणीवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार नोंदवत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. के.पी.टी.सी.एल. (कर्नाटक पॉवर ट्रांसमिशन कॉर्पोरेशन लिमिटेड) मध्ये नोकरीचे आश्वासन देत 25 वर्षांच्या तरूणीवर जलसंपदामंत्री रमेश जारकीहोळी यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप कलहळ्ळी यांनी पोलिस आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत केला आहे.

बंगाल निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला लागलं ग्रहण; पक्षांतर्गत खडाजंगी बाहेर

परंतु, कालांतराने पिडित तरूणीली के.पी.टी.सी.एल.मध्ये काम देण्यास रमेश जारकीहोळी यांनी नाकारल्याचे या तक्रारीत लिहिले आहे. पिडित तरूणीने त्यांचे एकत्र खाजगी क्षण रेकॉर्ड केल्याचे कळताच रमेश जारकीहोळी यांनी तिला व तिच्या कुटुंबाला धमकावल्याचादेखील आरोप होत आहे. मंगळवारी माध्यमांमध्ये व्हायरल झालेला व्हिडिओ फुटेज महिनाभरापूर्वीच्या असल्याचे सांगितले जात आहे. पीडितेच्या कुटुंबाने सामाजिक कार्यकर्ते कलहळ्ळी यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर दिनेश कलहळ्ळी यांनी पोलिस तक्रार दाखल करत पिडित तरूणी व तिच्या कुटुंबाला पोलिस सुरक्षा देण्याची मागणी केली. बंगळुरूमधील क्यूबन पार्क पोलिस स्टेशनच्या हद्दीतील हॉटेलमध्ये ही घटना घडल्याचा दावा कलहळ्ळी यांनी केला आहे.

आता खासगी क्षेत्रात स्थानिकांना मिळणार 75 टक्के आरक्षण; हरियाणा सरकारचा मोठा निर्णय

पोलिस आयुक्तांनी त्यांना क्यूबन पार्क पोलिसांकडे तक्रार कऱण्यास सांगितले. हे प्रकरण संवेदनशाल असल्याने एफआयआर दखल करण्याआधी सखोल चौकशी केली जाईल, असे क्यूबन पार्क पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले असल्याचे दिनेश कलहळ्ळी म्हणाले. दरम्यान, रमेश जारकीहोळी हे पूर्वी कॉंग्रेसमध्ये होते. कालांतराने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत कर्नाटकात ऑपरेशन लोटसची अंमलबजावणी करण्यात मोठं योगदान दिलं होतं. या प्रकरणामुळे कर्नाटकातील राजकारण तापण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. 

संबंधित बातम्या