Karnataka: येडियुरप्पांनंतर कोण होणार मुख्यमंत्री?

कर्नाटकात (Karnataka) भाजप सत्तेत येऊन 26 जुलैला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त ही बैठक बोलविण्यात आली आहे. यावेळी भोजन समारंभाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. यानंतर मुख्यमंत्री येडियुरप्पा (Chief Minister Yeddyurappa) राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेऊन राजीनामा देऊ शकतात.
मुख्यमंत्री येडियुरप्पा (Chief Minister Yeddyurappa) राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेऊन राजीनामा देऊ शकतात.
मुख्यमंत्री येडियुरप्पा (Chief Minister Yeddyurappa) राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेऊन राजीनामा देऊ शकतात. Dainik Gomantak

बंगळूर: कर्नाटकमध्ये राजकारण (Politics in Karnataka) चांगलेच तापले असून, तेथे नेतृत्वबदलाच्या चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री (CM) यांनी 22 जुलैला बैठक बोलावली आहे. कर्नाटकात भाजप सत्तेत येऊन 26 जुलैला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त ही बैठक बोलविण्यात आली आहे. यावेळी भोजन समारंभाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

यावेळीच मुख्यमंत्री येडियुरप्पा (Chief Minister Yeddyurappa) राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेऊन राजीनामा देऊ शकतात. तीन दिवसांपासून येडियुराप्पांनी दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी पक्ष श्रेष्ठींनी त्यांना मुख्यमंत्रीपदावरुन पाय उतार होऊन इतरांना संधी देण्याची सूचना केली.

मुख्यमंत्री येडियुरप्पा (Chief Minister Yeddyurappa) राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेऊन राजीनामा देऊ शकतात.
कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर पुन्हा भ्रष्टाचाराचे आरोप

त्याप्रमाणे 26 जुलैला होणाऱ्या या कार्यक्रमानंतर दोन दिवसांनी राजीनाम्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. कर्नाटकात 2023 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. पण सध्याच येडियुरप्पा यांच्या राजीनाम्याबाबत भाजपमधून कोणीही स्पष्ट बोलण्यास तयार नाही.

येडियुरप्पांनंतर कर्नाटकचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार?

कर्नाटकात घडणाऱ्या राजकीय घडामोडी पाहता, मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी जर राजीनामा दिला तर हे पदावर कोण विराजमान होणार हे अद्याप समोर आलेले नाही. यामध्ये केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, उपमुख्यमंत्री अश्वत्थनारायण, राज्य मंत्रिमंडळातील खाणउद्योग मंत्री मुरुगेश निराणी, भाजपचे राष्ट्रीय मुख्य सचिव बीएल संतोष यांची नावे चर्चेत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com