पाकिस्तानी वंशाच्या काश्मिरी सुनांची भारत सरकारकडे अनोखी मागणी

Kashmiri womans of Pakistani descent have demand to the Indian government to send them to Pakistan occupied Kashmir
Kashmiri womans of Pakistani descent have demand to the Indian government to send them to Pakistan occupied Kashmir

श्रीनगर: पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरमध्ये पाठविण्याची विनंती पाकिस्तानी वंशाच्या काश्मिरी सुनांनी सोमवारी सरकारकडे केली आहे. त्यांना भारताचे नागरिक समजले जात नसल्याचे कारण त्यांनी यासाठी दिले आहे. या महिलांचे पती पूर्वी दहशतवादी संघटनांशी संबंधित होते. नंतर सरकारच्या आत्मसमर्पण योजनेत त्यांनी शरणागती पत्करली व आता ते सामान्य जीवन जगत आहेत. 

पत्रकार परिषदेत बोलताना त्या आज म्हणाल्या की, आम्हाला घरी जाण्याची परवानगी देण्याची लेखी मागणी पाकिस्तानच्या दूतावासाकडून भारतीय अधिकाऱ्यांनी दर महिन्याला करण्यात येते. कुटुंबाची भेट घेण्यासाठी घरी जाण्यास भारतीय सरकारने परवानगी द्यावी. येथील सरकार आम्हाला भारतीय नागरिक मानत नाही, मग आम्हाला घरी का पाठवत नाही, असा सवाल त्यांनी केला. मूळ पाकिस्तानी सोमिया सदफ या काश्मिरी सूनेने नुकतीच निवडणूक लढविली होती. तिची उमेदवारी स्वीकारण्यात आली,  पण आम्ही आमच्या प्रश्‍नांवर आवाज उठवला की कोणतेही कारण न देता सरकारने त्याठिकाणची मतमोजणी थांबविली, अशी तक्रार या महिलांनी केली.

आणखी वाचा:

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com