केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय: दिेल्लीत सहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 19 एप्रिल 2021

दिल्लीमध्ये केजरीवाल सरकारनं सहा दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे.

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. राजधानी दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडू लागला आहे. वाढता कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी दिल्लीमध्ये केजरीवाल सरकारनं(Kejriwal government) सहा दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी 19 एप्रिलपासून 26 एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन लागू असणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील जनतेला संबोधित करताना ही माहिती दिली आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्याशी चर्चा करुन अरविंद केजरीवाल यांनी सहा दिवस लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. (Kejriwal governments big decision Six lockdowns announced in Delhi)

''आम्ही चाचण्या कमी न करता वाढवल्या आहेत. दिल्लीमध्ये रोज एक लाख चाचण्या होत आहेत. आम्ही कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे आकडे लपवले नाहीत. तसेच आम्ही आत्तापर्यंत खोटे बोललो नाही. दिल्लीमध्ये जी परिस्थिती आहे ती नेहमीच जनतेसमोर ठेवली आहे. दिल्लीत गेल्या 24 तासामध्ये 23 हजार 500 रुग्ण आढळले आहेत. दिवसाला 25 हजार कोरोना रुग्ण आढळत असतील तर आरोग्य व्यवस्था पुरती कोलमोडून पडेल. दिल्लीत 100 पेक्षा कमी आयसीयू बेड आहेत. ऑक्सिजनची कमतरता भासत आसल्यामुळे आम्ही केंद्र सरकारला वारंवार पत्र लिहलं आहे. एका खासगी रुग्णालयाने रात्री तीन वाजता ऑक्सिजन संपला होता असं सांगितलं. मात्र त्या रुग्णालयाला वेळीच ऑक्सिजनचा पुरवठा झाला नसता तर मोठी दुर्घटना ओडावली असती. औषधांचा तुटवडा जाणवत आहे. या सर्व गोष्टी पाहता दिल्लीत गंभीर परिस्थिती आहे,'' असं केजरीवाल यांनी म्हटलं.

मनमोहन सिंग यांचे नरेंद्र मोदींना पत्र; लसीबाबत दिल्या महत्त्वाच्या सूचना 

''दिल्लीमध्ये आत्तापर्यंत आपण परिस्थिती चांगली हाताळली आहे. दिल्लीची आरोग्य व्यवस्था सुमार राहिली आहे. कोणत्याही यंत्रणेच्या काही मर्यादा असतात,'' असंही त्यांनी सांगितलं.

 

संबंधित बातम्या