रिक्षा व टॅक्सीचालकांना केजरीवाल सरकारची मोठी मदत

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 4 मे 2021

रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मोठी मदत करण्याचा निर्णय केजरीवाल सरकारने घेतला आहे.

देशात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. दिल्लीमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेचा उद्रेक झाला असून अद्यापही परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. दिल्लीमधील (Delhi) आरोग्य व्यवस्थेची परिस्थिती अत्यंत बिकट असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी दिल्लीत तिसऱ्यांदा लॉकडाऊन (Lockdown) लावण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मोठी मदत करण्याचा निर्णय केजरीवाल सरकारने घेतला आहे.

दिल्लीमध्ये कडक लॉकडाऊन असतानाही पुन्हा सलग दोनदा लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. त्यामुळे राजधानीमधील रिक्षा चालक आणि टॅक्सीचालकांना मोठा फटका बसला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रिक्षा आणि टॅक्सीचालकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याची बाब लक्षात घेता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारने (Kejriwal governments) रिक्षा आणि टॅक्सीचालकांना प्रत्येकी 5000 रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. या मदतीमुळे आर्थिक संकटामध्ये सापडलेल्या रिक्षा आणि टॅक्सीचालकांना थोडासा दिलासा मिळेल असं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

Coronavirus: ‘’लॉकडाऊन एकमेव पर्याय’’ 

‘’दिल्लीमधील सर्व रेशन कार्डधारकांना, ज्यांची संख्या जवळपास 72 लाख आहे. त्यांना पुढील दोन महिने मोफत रेशन देण्याचा निर्णय केजरीवाल सरकारने घेतला आहे. दोन महिने रेशन देण्यात येणार म्हणजे राजधानीत दोन महिने लॉकडाऊन असणार नाही. आर्थिक संकटामध्ये सापडलेल्या गरजूंना ही मदत करण्यात येत आहे, अशी माहीती केजरीवाल यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या