'...विजेची गरज असणाऱ्यांनाच': केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय

1 ऑक्टोबरपासून ज्यांना विजेची गरज आहे त्यांनाच सबसिडी मिळणार आहे.
'...विजेची गरज असणाऱ्यांनाच': केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय
Arvind KejriwalDainik Gomantak

राजधानी दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी वीज सबसिडीबाबत मोठी घोषणा केली आहे. राजधानीत सध्या दिले जाणारे वीज अनुदान 1 ऑक्टोबर 2022 पासून बदलणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. जे लोक मागणी करतील त्यांना अनुदान दिले जाईल. किंबहुना, आता दिल्लीत स्वस्त वीज ऐच्छिक असेल, म्हणजेच कोणत्याही वीजग्राहकाला वीज सबसिडी हवी असेल, तर त्याला आतासारखीच सबसिडी मोफत किंवा अनुदानित वीज मिळेल. परंतु जर कोणी स्वत:ला सक्षम समजत असेल तर तो दिल्ली सरकारला (Government) सांगू शकतो की, त्याला वीज सबसिडी नको आहे आणि वीज सामान्य दराने वापरु शकतो.

Arvind Kejriwal
भाजपाचा अहंकार तोडण्यासाठी एक संधी द्या - अरविंद केजरीवाल

दरम्यान, दिल्लीत (Delhi) सत्तेत आल्यापासून आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) सरकार दिल्लीतील जनतेला 200 युनिटपर्यंत मोफत वीज देत आहे. ग्राहकांना सध्या 200 युनिटपर्यंत कोणतेही बिल भरावे लागत नाही, तर महिन्याला 201 ते 400 युनिट वीज वापरल्यास 800 रुपये अनुदान मिळते. त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यासोबतच मध्यमवर्गीयांनाही त्याचा लाभ मिळत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.