हल्याळ मामलेदार कार्यालयात केम्पेगौडा जयंती साजरी

Dainik Gomantak
शनिवार, 27 जून 2020

बंगळूर शहर संस्थापक नाड प्रभू  असे राज्यात संबोधले जाणारे  केम्पेगौडा यांची जयंती शहरातील मामलेदार कार्यलया साधेपणाणे साजरी करण्यात आली.  

हल्याळ

हल्याळ  येथील तालुका प्रशासन, पोलीस विभाग, आणि नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने बंगळूर शहर संस्थापक नाड प्रभू  असे राज्यात संबोधले जाणारे  केम्पेगौडा यांची जयंती शहरातील मामलेदार कार्यलया साधेपणाणे साजरी करण्यात आली.   यावेळी बोलताना  तहसीलदार  विद्याधर गुळगुळी यांनी  केंपेगौडा यांनी बंगळूर शहराच्या विकासाठी दूरदृष्टी ठेवून केलेलं. जनउपयोगी कार्य आजही  राज्यातील जनतेच्या मनात आहे. त्याचे हे कार्य राज्यासह देशाला आणि जगाला प्रेरणादायक ठरले आहे. त्यांच्या या कार्यामुळेच आज बंगळूर शहर प्रेक्षणीय स्थळाबरोबर तलाव निर्मिती आणि शिक्षणास जास्त महत्व देणारे शहर ठरले आहे.. अशा या या प्रेरणादायक व्यक्तीस  आपण सलाम करून त्यांचा आदर्श युवा पिढीने घेतला पाहिजे.. यावेळी  हल्याळ तालुका वैद्याधिकारी डॉ रमेश कदम, सी.पी. आ . बी. एस. लोकापूर, नगरपालिका  मुख्याधिकारी केशव चौगुले, व मान्यवर उपस्थित होते.

 

 

संबंधित बातम्या