केरळमध्ये 8 मे ते 16 मे पर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर

दैनिक गोमंतक
गुरुवार, 6 मे 2021

राज्यामध्ये 41 हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती.

देशात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. यातच आता केरळ सरकारने (Keral Government) राज्यात संपूर्ण लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा केली आहे. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढत असल्याने 8 मे ते 16 मे पर्यंत राज्यात संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्यात बुधवारी कोरोना रुग्णसंख्येत उच्चांक पहायला मिळाल्यानंतर संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी राज्यामध्ये 41 हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. (Kerala announces complete lockdown from May 8 to May 16)

मुख्यमंत्री कार्यालयाकडून सोशल मिडियावरील ट्विटरवरुन ट्विट करत देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री विजयन (Vijayan) यांनी दिलेल्या आदेशानुसार संपूर्ण केरळ राज्यात 8 मे रोजी सकाळी सहा वाजल्यापासून ते 16 मे सकाळी सहा पर्यंत लॉकडाऊन असणार आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याच्या पाश्वभूमीवर हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

'कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी तयार रहा!'', केंद्रीय...

केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन (Pinarayi Vijayan) यांनी केरळमध्ये कोरोनाची स्थिती अत्यंत भयावह असल्याचं सांगत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं म्हटलं आहे. राज्यातील स्थितीचा आढावा घेतल्यानंतर लॉकडाऊन करण्याता निर्णय घेतला आहे. राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या मदतीने राज्यात वार्डस्तरीय समिती तसेच रॅपिड रिस्पॉन्स टीम बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्याचा सूचना यावेळी मुख्यमंत्री विजयन यांनी दिल्या आहेत.

केरळमध्ये अत्तापर्यंत 17 लाख 43 हजार 932 नवे कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर त्यापैकी 13 लाख 62 हजार कोरोना रुग्ण उपचारानंतर ठीक झाले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे ऑक्सिजन (Oxygen), रेमडिसीव्हीर (Remdesivir) आणि औषधांची मागणीही मोठ्याप्रमाणात वाढत आहे, असं देखील विजयन यांनी सांगितलं आहे.
 

संबंधित बातम्या