अखेर २८ वर्षांनंतर मिळाला न्याय; सिस्टर हत्या प्रकरणात पादरी आणि नन यांना जन्मठेप

दैनिक गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 23 डिसेंबर 2020

केरळच्या एका सीबीआय न्यायालयाने १९९२ मध्ये झालेल्या १९ वर्षीय सिस्टरच्या हत्या प्रकरणात आरोपी कॅथलिक पादरी थॉमस कोट्टर आणि सिस्टर सेफी यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने सिस्टर अभयाच्या हत्याप्रकरणातील हा महत्वपूर्ण निकाल आज दिला. 

तिरूवनंतपुरम- केरळच्या एका सीबीआय न्यायालयाने १९९२ मध्ये झालेल्या १९ वर्षीय सिस्टरच्या हत्या प्रकरणात आरोपी कॅथलिक पादरी थॉमस कोट्टर आणि सिस्टर सेफी यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने सिस्टर अभयाच्या हत्याप्रकरणातील हा महत्वपूर्ण निकाल आज दिला. 

काय होते प्रकऱण?  

1992मध्ये कोट्टायमच्या एका कॉन्वेंटच्या विहिरीत सिस्टर अभयाचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणी फादर थॉमस कोट्टर आणि सिस्टर सेफी यांना अटक केली. दोघेही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र, याप्रकरणी फादर फुथराकयाल यांना पुराव्यांअभावी मुक्त करण्यात आले आहे. या युवतीच्या मृत्यूच्या 28 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. ती कॉन्वेंटमध्ये राहत होती. तिच्या आईवडिलांचेही काही वर्षांपूर्वीच निधन झाले होते. ते आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्याची वाट पाहत मृत्यू पावले.

 सीबीआय तपासाच्या आधी स्थानिक पोलिसांनी तपास करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी याप्रकरणाला आत्महत्येचा प्रयत्न असल्याचे म्हटले होते. मात्र, त्यानंतर 2008मध्ये सीबीआयने हे प्रकरण हातात घेतले. यानंतर मागील वर्षी 26 ऑगस्टला याप्रकरणाची हिअरिंग सुरू झाली. यादरम्यान अनेकांनी साक्ष देण्यास नकास दिला होता.

संबंधित बातम्या