केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांना कोरोना विषाणूची लागण

केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांना कोरोना विषाणूची लागण
Kerala CM

देशात कोरोनाचा संसर्ग खूप वेगाने पसरत आहे. त्यातच आता केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांना देखील कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. पी. विजयन यांनी 3 मार्चला कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. पी. विजयन यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून स्वतःला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. याशिवाय पी. विजयन यांनी सोशल मीडियावरील आपल्या ट्विट मध्ये आपला कोरोना अहवाल सकारात्मक आला असल्याचे नमूद करत, कोझिकोड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार केले जात असल्याचे म्हटले आहे. 

याशिवाय, मुख्यमंत्री पी. विजयन यांनी आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी सेल्फ ऑब्जर्वेशनमध्येच रहात, कोरोनाची चाचणी देखील करून घ्यावी असे आवाहन ट्विट मधून केले आहे. केरळ मधील विधानसभा निवडणुकीच्या वेळी आणि नेमके मतदानाच्या दिवशीच मुख्यमंत्री पी. विजयन यांची मुलगी वीणा विजयन यांनाही संसर्ग झाला असल्याचे समोर आले होते. तर, केरळमध्ये गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गाची 4,353 नवीन प्रकरणे झाली आहेत.

यापूर्वी, भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरला सुद्धा कोरोनाचा संसर्ग झाला होता. यानंतर त्याला हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज सचिन तेंडुलकरला हॉस्पिटल मधून डिसचार्ज देण्यात आला आहे. सचिनचा कोरोना अहवाल 27 मार्च रोजी सकारात्मक आला होता. तसेच कॉंग्रेसचे सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांचे पती रॉबर्ट वड्रा यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे आढळले होते. यानंतर प्रियांका गांधी यांनी स्वतःला देखील क्वारंटाईन केले होते. याशिवाय, अभिनेता अक्षय कुमारने देखील स्वत:ला कोरोनाची लागण झाल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली होती. 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com