कोरोना जातो न जतो , तेवढ्यात आता 'बर्ड फ्लू'चे संकट ; केरळमध्ये बदकांना मारणार

वृत्तसंस्था
मंगळवार, 5 जानेवारी 2021

कोरोनानंतर आता केरळमध्ये बर्ड फ्लूचा प्रसार झाल्याचे आढळले आहे. अलाप्पुझा आणि कोट्टायम जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतीत बदकांचा मृत्यू झाला.

तिरुअनंतपुरम :  कोरोनानंतर आता केरळमध्ये बर्ड फ्लूचा प्रसार झाल्याचे आढळले आहे. अलाप्पुझा आणि कोट्टायम जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतीत बदकांचा मृत्यू झाला. काही ठिकाणी कावळेही मृतावस्थेत आढळले. संसर्गबाधित भागांतील बदकांना ठार करण्याचा आदेश प्रशासनाला दिला.

कुट्टनाडू, कुमारकम, थलावादी आणि इदातवा पल्लीपावू गावांत बर्ड फ्लूचा संसर्ग झाला. याचे नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यातून ते पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. आतापर्यंत १२ हजार बदकांचा मृत्यू झाला. एक किलोमीटर परिसरातील सर्व बदकांना मारण्याची सूचना शीघ्र कृती दलाला दिली असून साधारण ३६ हजार बदकांवर मृत्यू ओढावणार आहे. 

संबंधित बातम्या