...जेव्हा एका मुस्लीम महिलेने कृष्णाचे पेंटींग हिंदू मंदिराला दिले भेट

केरळमधील (Kerala) कोझीकोडे येथील हिंदू मंदिराला एका मुस्लिम महिलेने भगवान श्रीकृष्णाचे पेंटिंग भेट दिल्याने ती चर्चेचा केंद्रबिंदू बनली आहे.
...जेव्हा एका मुस्लीम महिलेने कृष्णाचे पेंटींग 
हिंदू मंदिराला दिले भेट
Jasna SalimDainik Gomantak

भारत (India) हा सर्वधर्मसमभाव, सहिष्णु असल्याची प्रचिती केवळ ते शब्द उच्चारुन येत नाही तर, त्या शब्दांसाठी कृतीही आवश्यक असते. अशीच सर्वधर्मसमभाव जागृत करणारी घटना केरळमध्ये घडली आहे. केरळमधील कोझीकोडे येथील हिंदू मंदिराला एका मुस्लिम महिलेने भगवान श्रीकृष्णाचे पेंटिंग भेट दिल्याने ती चर्चेचा केंद्रबिंदू बनली आहे. केरळमधील (Kerala) कोझीकोडे (Kozhikode) येथील जसना सलीम (Jasna Salim) या 28 वर्षीय मुस्लीम महिलेने भगवान श्रीकृष्णाच्या बालरुपाचे पेंटिंग चर्चेचा विषय ठरले आहे. केरळच्या पठानमथिट्टा जिल्ह्यातील पांडलमजवळ उलानाडू येथील श्री कृष्ण स्वामी मंदिरात जसना सलीम यांनी दिलेले पेटींग ठेवण्यात आले आहे. या पेंटिंगला 'उन्नी कन्नन' (Unni Kannan) असे नाव देण्यात आले असून ज्याचा मल्याळम भाषेत त्याचा अर्थ 'कृष्णाचे बाल रुप' असा होतो.

Jasna Salim
भारतातील 'ही' 10 सुंदर गावे पाहिलेत का? परदेशातील सुंदर गावेही पडतील फिके

जसना सलीमने गेल्या सहा वर्षात भगवान श्रीकृष्णाची शेकडो पेंटिग बनवले आहेत, परंतु त्यांना त्यांच्या घरी अशाप्रकारचे पेंटिंग ठेवण्यास अनुमती दिली नव्हती. ती अनेक वर्षांपासून त्रिशूरमधील प्रसिद्ध गुरुवायूर श्री कृष्ण मंदिराला छोट्या कृष्णाची प्रतिमा भेट देत आहेत, परंतु ही परंपरा आणि प्रथा तिला मंदिरात किंवा गर्भगृहात प्रवेश करु देत नाही.

जसना सलीम यांना दोन मुले आहेत. स्वतः या तीन भावंडांमध्ये सर्वात लहान असल्याने तिचे आई -वडील तिला लहानपणी 'कन्ना' म्हणत असत, ज्याचा अर्थ 'प्रिय मुलगा' असा होतो. जसना गेल्या 5-6 वर्षांपासून भगवान श्रीकृष्णाची पेंटिग बनवत आहे. परंतु रविवारी त्यांचे स्वप्न साकार झाले असून त्यांच्या पेंटिंगला मंदिराच्या आत देवतेच्या मूर्तीशेजारी जागा मिळाली. जसना सलीमने पीटीआयला सांगितले की, हे माझ्यासाठी खरोखरच स्वप्न पूर्ण झाल्यासारखे होते. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी एका मंदिराच्या आत गेल्यानंतर गर्भगृहासमोर एका देवतेची मूर्ती उभी असल्याचे पाहिले.

Jasna Salim
भारतातील 10 प्रसिद्ध ठिकाणांची करा सफर

नेहमीप्रमाणे नमाज अदा केल्यानंतर जसना मंदिरात पोहोचल्या. त्यावेळी जसना म्हणाल्या, “उलानाडू मंदिराच्या अधिकाऱ्यांच्या वर्तवणूकीने मी खूप प्रभावित झाले. पुजाऱ्यांनी मूर्तीला पुष्पहार अर्पण केल्यानंतर पूजाही केली. कृष्णाची मूर्ती बनवण्यासाठी जसनाला त्यांच्याच घरातील सदस्यांचा विरोधाचाही सामना करावा लागला. मात्र तिच्या या कामात साथ दिली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com